रिलेशनशीपमध्ये असताना तुमच्या पार्टनरला असुरक्षित वाटण्याची अनेक कारण असू शकतात. कारण एकमेंकावर प्रेम करत असलेल्या कपल्सना असं वाटणं सामान्य बाब आहे. पण प्रत्येक रिलेशनशीपमध्ये असलेल्या मुलांचे आणि मुलींचे स्वभाव वेगवेगळे असतात. कोणी समजून घेणारे असतात, कोणाला लगेच राग येतो, कोणी संशयी वृत्तीचे असतात. तसंच कोणी सतत जास्त काळजी करणारे असतात.
काही जणांना शांत राहायला आवडत, तर काहीजण नेहमी भांडत नाही तर कधीकधी भांडतात. पण ते भांडण खूप टोकाला जात असतं. अर्थात कोणताही प्रसंग असो. नातं जर टिकवून ठेवायचं असेल तर प्रत्येकालाच एकमेकांच्या स्वभावाची ओळख होणं गरजेचं आहे. तुम्हाला सुध्दा तुमच्यात होणारी भांडण टाळायची असतील तर पार्टनरला कोणत्या गोष्टींशी भीती वाटते आणि कधी असुरक्षित वाटते. हे माहीत असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया पार्टनरला कोणत्या गोष्टीची भिती वाटते.
इतरांची प्रशंसा करणं
(Image credit- Elite daily)
जेव्हा तुम्ही इतर पुरूषांची प्रशंसा करत असता तेव्हा तुमच्या पार्टनरला भीती वाटू शकते. दुसऱ्या मुलाच्या नोकरीबद्दल, त्याच्या दिसण्याबद्दल जर तुम्ही तुमच्या पार्टनरसमोर बोलत असाल तर तेव्हा त्याला असुरक्षित वाटण्याची शक्यता असते. पण तुमचा पार्टनर तुमच्याशी कमिटेड असेल तर तो तुम्हाला हर्ट होईल असं वागणार नाही.
भावनिक गरज
(Image credit- Elite daily)
प्रत्येक व्यक्तीला शारीरिक आणि आर्थिक गरजेसोबतच भावनिक गरज सुद्धा असते. त्यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरशी त्याला समजून घेऊन बोलत नसाल तर त्याला वाईट वाटू शकतं तसंच ते स्वतःच दुख मनातच ठेवून नकारात्मकतेकडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही शक्य होईल तितकं तुमच्या पार्टनरसोबत रोमॅन्टीक क्षण घालवण्याचा प्रयत्न करा.
भूतकाळाची आठवण
आधीच्या नात्याबद्दल सतत आठवण करून दिली तर पार्टनरला भूतकाळ आठवून त्रास होण्याची शक्यता असते. तुमच्यासोबत आधीच्या रिलेशनशीपमध्ये काही झालं असेल तर त्याचा परिणाम दुसऱ्या नात्यांवर होणार नाही याची खात्री घ्या. दोन व्यक्तिंना एकाच तराजूत तोलू नका.
मुलीने स्वतःपेक्षा जास्त कमावणं
एखादी मुलगी स्वतः आपल्या पायांवर उभी राहत असेल किंवा तिने चांगल्या पगाराची नोकरी मिळवली असेल तेव्हा ती मुलगी आपल्याला सोडून तर जाणार नाही याची भीती वाटत असते. तेव्हा स्वतः बद्दल कमीपणा वाटण्याची भावना य पार्टनरच्या मनात येत असते. तसंच जर तुमच्या फ्रेन्डस सर्कलमध्ये जास्त मुलं असतील तरी पार्टनरला असुरक्षित वाटू शकतं. अर्थात जर एकमेकांवर विश्वास आणि अंडस्टॅडिंग असेल तर या समस्या कमी प्रमाणात उद्भभवतात.