लहान मुलं आपल्या तोंडाने काही बोलू शकत नाही. पण आपल्या समस्या किंवा जर काही त्रास होत असेल तर इशारा करून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकदा लहान मुलं रडत असतात पण नेमकं त्यांना काय होत आहे. हे समजण्यासाठी मार्ग नसतो. चला तर मग जाणून घेऊया बाळांना इशारा करून काय म्हणायचं असतं.
डोळे चोळणे
तर तुमचं मुलं डोळे चोळत असेल तर बाळाच्या डोळ्यांना काही त्रास होत असल्याचे दिसून येतं. जर डोळ्यात कचरा गेला असेल किंवा डोळ्यातून पाणी येत असेल तर बाळाच्या डोळ्यांचा त्रास दूर करण्याचा प्रयत्न करा. (हे पण वाचा-स्तनपान करताना चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, नाहीतर पडू शकतं महागात)
रडणे
बाळाच्या रडण्याची अनेक कराणे असू शकतात. त्यात जर बाळाला भूक लागली किंवा बाळाच्या शरीरातील कोणताही अवयव दुखत असेल तर बाळाला रडायला येत. पण रडण्याचे अनेक अर्थ असू शकतात. जर तुमचं बाळ डोळे बंद करून रडत असेल तर त्याला भीती वाटत आहे असा त्याचा अर्थ होतो. याऊलट जर तुमचं बाळ डोळे उघडे ठेवून रडत असेल तर बाळाला भूक लागली आहे. असा त्याचा अर्थ होतो. म्हणून रडण्याचं कारण ओळखून आपण बाळाच्या जेवणाची व्यवस्था करायला हवी. (हे पण वाचा-डाएट नाही तर हुला हूपिंग करून पोटावरची चरबी करा कमी)
हवेत हात पाय मारणे
जेव्हा लहान मुलं खूप खूश असतात. तेव्हा ते हवेत हात पाय मारत असतात. असं केल्यामुळे लहान मुलांच्या मासंपेशीच्या विकासाला चालना मिळते. पण कधी कधी मुलांना काही त्रास होत असेल तर आपल्या समस्या सांगण्यासाठी सुद्धा हातांची आणि पायांचा हालचाल करतात. बाळाचे असे हावभाव पाहून तुम्ही बाळाचं डायपर ओलं झालं असेल तर त्वरीच बदलून घ्या.नाहीतर बाळाला खाज येऊन रडण्याची सुरूवात होईल.
गुडघ्याला पाय लावून झोपणे
अनेकदा मुलं आपल्या पाय गुडघ्याला चिकटवून झोपतात. असं झोपल्यामुळे त्यांनी पचनासंबधी आजार होण्याची शक्यता असते. तसंच दूध प्यायल्यानंतर बाळा कोणत्या प्रकारचा त्रास तर होत नाहीना हे पाहणं महत्वाचं असतं. कारण जर तुमच्या बाळाला कोणत्या प्रकारचा त्रास झाला तर तुमच्या आहारात बदल करण्याची गरज आहे.