शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

‘I Love You..' पेक्षा या ‘८’ गोष्टी जास्त ऐकणे पसंत करतात पार्टनर !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 10:43 AM

जरी दोघांत वाद झाले असतील तर प्रेमाचे दोन शब्द बोलण्याने पुन्हा दोघांचे नाते बहरु शकते. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आपल्या नात्याला पुन्हा नवसंजिवनी देऊ शकतात.

बऱ्याचजणांना वाटते की, आपला पार्टनर काळजी घेणारा आणि प्रत्येक समस्येत सोबत असणारा हवा. मात्र सध्याच्या धावपळीच्या युगात पती-पत्नींना एकमेकांना पुरेसा वेळ मिळत नाही. नात्याला निभविण्यासाठी गरज आहे ती, पार्टनर्समध्ये प्रेम आणि आदर यांची. जरी दोघांत वाद झाले असतील तर प्रेमाचे दोन शब्द बोलण्याने पुन्हा दोघांचे नाते बहरु शकते. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आपल्या नात्याला पुन्हा नवसंजिवनी देऊ शकतात.  * 'तू खूप सुंदर आहे'आपल्या पार्टनरच्या बऱ्याच गोष्टी आपणास आवडतात मात्र त्याशिवाय जर आपल्या पार्टनरला ‘तू खूप सुंदर आहे...’ अशी कॉम्पलिमेंट देत असाल तर त्याला खूप चांगले वाटते.     * 'ओके, मी सांभाळून घेईल'बऱ्याचदा एखादे काम पूर्ण न झाल्याने आपला पार्टनर नाराज होतो, अशावेळी आपण पुढाकार घेऊन ओके, मी सांभाळून घेईल असे म्हणून ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करा. * ‘मी आहे ना...’ आपल्या पार्टनरच्या चुकांना वारंवार दर्शविण्यापेक्षा त्याला आपल्या सोबतीची जाणिव करुन द्या. याने आपला पार्टनर चुका करणे बंद करेल आणि दोघांत प्रेमदेखील वाढेल.  * ‘सर्व काही व्यवस्थित होईल...’ कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास आपल्या पार्टनरशी नाराज होण्यापेक्षा त्याची हिंमत वाढवा, त्यांना विश्वास द्या की, सर्व काही व्यवस्थित होईल.  * 'काही हरकत नाही' बऱ्याचदा पार्टनरच्या तोंडून नकळत अशी गोष्ट निघते की ज्यामुळे आपणास वाईट वाटते. मात्र जर आपला पार्टनर आपल्या जवळ येऊन पश्चाताप करत असेल तर संताप करण्याऐवजी काही हरकत नाही म्हणून माफ करा.   * 'पार्टनरचे म्हणणे ऐकणे'जर आपला पार्टनर आपणास काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचे म्हणणे ऐकून घ्या. याने आपल्या पार्टनरला आपण सोबत असण्याची जाणिव होईल.     * 'पोहचल्यानंतर कॉल किंवा मॅसेज करावा'काळजी घेणारा पार्टनर आपण एखाद्या ठिकाणी पोहचल्यानंतर आपणाकडून कॉल किंवा मॅसेजची अपेक्षा करतात. अशावेळी आपलेही कर्तव्य असते की, त्याला आपण व्यवस्थित पोहचल्याचे कळविले पाहिजे.  * 'पार्टनरचे मत जाणून घेणे'घरातील कोणत्याही लहान-मोठ्या गोष्टी आणि निर्यणांबाबत पार्टनरचे मत जाणून घेणे आवश्यक असते. याने तो आपल्याला घराचा एक महत्त्वपूर्ण सदस्य समजू लागतो आणि जबाबदाऱ्याही चागंल्या प्रकारे पार पाडतो. Also Read : ​OMG : प्रेम न करता थेट लग्न करणारे ‘या’ फायद्यांपासून राहू शकतात वंचित !