व्हॅलेंटाइन वीकला कालपासून सुरूवात झाली. काल रोज डे साजरा करण्यात आला. प्रिय व्यक्तींना गुलाब देऊन प्रेम, आभार व्यक्त करण्यात आले. आज आहे प्रपोज डे. म्हणजे आज प्रिय व्यक्तीला सांगायचं असतं की, तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. मात्र प्रेम व्यक्त करत असताना काही जरा हटके कल्पना वापरल्या तर कदाचित तुम्हाला मिळणारा नकार होकारात बदलू शकतो.
1. पहिल्या डेटच्या आठवणी करा जागा : गर्लफ्रेंडसोबत आपल्या फर्स्ट डेटच्या आठवणी जागवा. आपल्या पार्टनरला घेऊन तुम्ही पहिल्या डेटसाठी कोठे गेले होतात?, तुम्ही दोघं पहिल्यांदा कोठे भेटले होतात?, आपल्या पहिल्या डेटच्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा गर्लफ्रेंड जुन्या आठवणींमध्ये हरवून जाईल, तेव्हा योग्य वेळी प्रपोज करा.
2. खेळामधून करा प्रपोज : या प्लानमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींची मदत घ्यावी. डम शराज गेम खेळा आणि याद्वारे आपल्या गर्लफ्रेंड 'मुझसे शादी करोगी?' विचारुन थेट प्रपोज करा. गेमबाबत आपल्या मित्रमैत्रिणींना आधीच कल्पना द्यावी. पण, खेळ खेळताना सिनेमाच्या नावाचा अभिनय तुम्ही करुन दाखवणार आणि ते ओळखायचं काम तुमच्या पार्टनरच करायचंय, हे लक्षात असू द्या. अशा पद्धतीनं हसत-खेळत आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करा.
3. डेस्टिनेशन प्रपोज : गर्लफ्रेंडला शहराबाहेर फिरायला घेऊन तिला प्रपोज करणं, तुमच्या खिशाला परवडणारं असेल तर याहून बढिया पर्याय तुमच्यासाठी असूच शकत नाही. नवीन ठिकाणाचे पर्यटनही होईल आणि तुमचे महत्त्वाचे कामदेखील होईल. गर्लफ्रेंडला देशात किंवा परदेशात जिथे तुमची इच्छा असेल तेथे भ्रमंतीसाठी न्या आणि या स्पेशल पिकनिकवर तिला प्रपोज करा.
4. फ्लाइटमध्ये करा प्रपोज : सुट्ट्यांदरम्यान तुम्ही आपल्या गर्लफ्रेंडसोबत फिरण्यास जात आहात, तर 35 हजार फूट उंचावर असलेल्या विमानात गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याची एक भारी संधी गमावू नका. फ्लाइटमध्ये असताना अगदी हटके अंदाजात तिला प्रपोज करा. हवे असल्यास याबाबत एअरलाइन स्टाफसोबत आधीच बोलणीदेखील करा.
5. ट्रेजर हंट प्रपोज : गर्लफ्रेंडला हटके आणि भारी अंदाजात प्रपोज करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे ट्रेजर हंट गेम. तुमच्या दोघांच्या ओळखीच्या, आठवणी असलेल्या ठिकाणी तिच्यासाठीची अंगठी लपवून ठेवा आणि निरनिराळी कोडी घालून तिला अंगठी शोधायला लावा. तिनं अंगठी शोधल्यानंतर तिला प्रपोज करा.