(image credit-stylegood)
व्हॅलेंटाइन वीकला कालपासून सुरूवात झाली. काल रोज डे साजरा करण्यात आला. प्रिय व्यक्तींना गुलाब देऊन प्रेम, आभार व्यक्त करण्यात आले. आज आहे प्रपोज डे. म्हणजे आज प्रिय व्यक्तीला सांगायचं असतं की, तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. मात्र प्रेम व्यक्त करत असताना काही जरा हटके कल्पना वापरल्या तर कदाचित तुम्हाला मिळणारा नकार होकारात बदलू शकतो.
प्रेम करणे सोपे वाटत असेल तरी प्रपोज करणे खूप अवघड काम. प्रपोज करण्यासाठी खूप सराव करुनही प्रत्यक्षात मात्र सारंच बारगळतं. पण डरने का नही...मन की बात सरळ बोलून टाकायची... जास्तीत जास्त काही होईल नकारच मिळेल....पण मन की बात सांगितल्याचे समाधान तरी मिळेल... आणि कुणास ठाऊक या टिप्सचा वापर करून तुम्हाला तुमचे प्रेम मिळेलही.
पहिल्या डेटच्या आठवणी करा जागा
गर्लफ्रेंडसोबत आपल्या फर्स्ट डेटच्या आठवणी जागवा. आपल्या पार्टनरला घेऊन तुम्ही पहिल्या डेटसाठी कोठे गेले होतात?, तुम्ही दोघं पहिल्यांदा कोठे भेटले होतात?, आपल्या पहिल्या डेटच्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा गर्लफ्रेंड जुन्या आठवणींमध्ये हरवून जाईल, तेव्हा योग्य वेळी प्रपोज करा.
(Image credit- love to know)
डेस्टिनेशन प्रपोज
गर्लफ्रेंडला शहराबाहेर फिरायला घेऊन तिला प्रपोज करणं, तुमच्या खिशाला परवडणारं असेल तर याहून बढिया पर्याय तुमच्यासाठी असूच शकत नाही. नवीन ठिकाणाचे पर्यटनही होईल आणि तुमचे महत्त्वाचे कामदेखील होईल. गर्लफ्रेंडला देशात किंवा परदेशात जिथे तुमची इच्छा असेल तेथे भ्रमंतीसाठी न्या आणि या स्पेशल पिकनिकवर तिला प्रपोज करा.
ट्रेजर हंट प्रपोज
गर्लफ्रेंडला हटके आणि भारी अंदाजात प्रपोज करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे ट्रेजर हंट गेम. तुमच्या दोघांच्या ओळखीच्या, आठवणी असलेल्या ठिकाणी तिच्यासाठीची अंगठी लपवून ठेवा आणि निरनिराळी कोडी घालून तिला अंगठी शोधायला लावा. तिनं अंगठी शोधल्यानंतर तिला प्रपोज करा.
चाय पे चर्चा नो खर्चा
तुमचा आणि तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात चहा हा अविभाज्य घटक असेल. तर मस्तपैकी घरातच एकत्र चहा घेण्याचा कार्यक्रम आखा. एकत्र चहा बनवत इधर-उधर की बातोंसहीत दोघांमधील गप्पा शेअर करा. गप्पांच्या ओघात तुमच्या दिल की बात ओठांवर आणून तिला प्रपोझ करा. ही भन्नाट कल्पना तर तुमच्या खिशालाही परवडणारी आहे.
प्रेम पत्र लिहा
'प्रेम पत्र वगैरे लिहिण्याचा जमाना गेला भाई'.... 'कबुतर जा जा जा'चे दिवस गेले, अशी वाक्य हल्ली कानावर येतच असतात. पण आजही मुलींनी पत्र लिहिलेले आवडते. त्यामुळे प्रपोझ करताना छोटंस का होईना पण पत्र लिहा. त्यात तुमच्या दोघांच्या एखाद्या फोटोचाही समावेश करा. प्रपोझ करण्याची ही पद्धत तिला नक्कीच आवडेल.
समुद्र किनारी गाणं गा
समुद्र किनारी एकत्र फिरायला जा... गप्पा मारा... आणि एखादं प्रेम गीत गाऊन वातावरण रोमँटिक करुन तिच्याजवळ प्रेमाच्या भावना व्यक्त करा. या गुलाबी वातावरणात तुम्हाला तिच्याकडून जादूची झप्पी मिळून होकारही मिळू शकतो.आवडत्या व्यक्तीला प्रपोझ करण्यासाठी तुम्हाला महागडं आणि मोठं गिफ्टच विकत घ्यायला हवं, असा काही नियम नाही. अशा छोट्या-छोट्या गोष्टींच्या माध्यमातूनही तुम्ही तिच्या किंवा त्याच्यासमोर 'हाल-ए-दिल' बयाँ करू शकता.
लाँग ड्राइव्ह
थंडगार ठिकाणी आपल्या फ्रेंडला लाँग ड्राइव्हवर जा आणि कूल रोमँटिक वातावणात तिचा हात पकडून तिला प्रपोज करा.