भावा-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेकदा रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर संपूर्ण कुटुंबातील मंडळी एकत्र येतात. दररोज भांडणारे भाऊ-बहिण यादिवशी मात्र एकमेकांसोबत मस्ती करत वेळ घालवतात. एकमेकांना आवड जपत गिफ्ट्स देतात. घरोघरी तर चविष्ट पक्वानांची मेजवानीच असते. यासर्व गोष्टींमुळे या दिवसाचा आनंद द्विगुणीत होतो. पण अशातच अनेकदा आपण आपल्या निसर्गाकडे दुर्लक्षं करतो. सणाच्या दिवशी आपण अनेक अशा गोष्टींचा वापर करतो, ज्या निसर्गासाठी घातक ठरतात.
आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की, आनंदाचा हा उत्सव आपल्या निसर्गासाठी नुकसानदायी नसावा. रक्षाबंधन म्हणजे, बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते. सध्या बाजारात अनेक रंगीबेरंगी राख्या आहेत. त्यातील अनेक ट्रेन्डी राख्या तयार करण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. अशावेळी बाजारात अनेक इको-फ्रेंडली राख्याही आलेल्या आहेत. अशावेळी हा आनंदाचा सण साजरा करताना तुम्ही निसर्गाचाही विचार करू शकता आणि इको-फ्रेंडली राखी वापरून निसर्ग संवर्धाच्या दृष्टीने पाऊल उचलू शकता.
बायोडीग्रेडेबल राखी खरेदी करा
ट्रेडिशनल दिसणाऱ्या राखण्यांमध्येही प्लास्टिकच्या मण्यांचा वापर करण्यात आलेला असतो. लहान मुलांसाठी मिळणाऱ्या राख्यांमध्येही प्लास्टिकच्या खेळण्यांचा वापर केलेला असतो. त्यामुळे अशा राख्यांव्यतिरिक्त तुम्ही सिंम्पल रंगी-बिरंगी धाग्यांच्या राख्या खरेदी करू शकता.
सीड राखी
एखादी अशी राखी खरेदी केली तर, जी भाऊ काही दिवसांनी फेकण्याऐवजी एखाद्या कुंडीत पेरून ठेवेल आणि काही दिवसांनी त्याचं एक छानसं रोपटं उगवेल. बाजारात सीड्स राख्याही उपलब्ध आहेत. ज्यांमध्ये सीड्स महणजेच वेगवेगळ्या झाडांच्या बिया लावण्यात येतात. त्याला सीड राखी असं म्हणतात. त्यामुळे रक्षाबंधनानंतर हे सीड्स मातीमध्ये पेरल्यावर रक्षाबंधनानंतरही राखीची आठवण भावासोबत राहिल.
राखीसोबत प्लास्टिक पाठवू नका
जर तुम्ही आणि तुमचा भाऊ एकाच शहरात राहत नसाल तर तुम्ही त्यांना राखी पोस्ट करत असाल. अनेकदा राखीसोबत एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अक्षताही पाठवल्या जातात. हे प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये ठेवण्याऐवजी पेपरमध्ये बांधून पाठवू शकता.
गिफ्ट
गिफ्ट देणं हा या सणाचा सर्वात महत्त्वाचा आणि इटरेस्टिंग भाग आहे. परंतु, हे गिफ्ट र्व्हप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टी पर्यावरणासाठी घातक ठरतात. कारण गिफ्ट ओपन केल्यानंतर र्व्हपर टाकूनच दिले जाते. जर तुम्हाला बहिनीला एखादं सरप्राइज गिफ्ट द्यायचं असेल तर एखाद्या दुपट्ट्यामध्ये र्व्हप करा. गिफ्ट ओपन केल्यानंतर बहिण तो दुपट्टा वापरूही शिकेल.