शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

रणवीर सिंगने सांगितलं Happy Married Life चं सीक्रेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 16:41 IST

बॉलिवूडचा सर्वात एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग आणि बॉलिवूडची मस्तानी म्हणून लोकप्रिय असलेली दीपिका पोदुकोन यांच्या लग्नाचा विषय चांगलाच गाजला.

बॉलिवूडचा सर्वात एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंग आणि बॉलिवूडची मस्तानी म्हणून लोकप्रिय असलेली दीपिका पोदुकोन यांच्या लग्नाचा विषय चांगलाच गाजला. त्याला त्यांसंबंधी वेगवेगळे प्रश्न विचारले गेले आणि अजूनही विचारले जात आहे. लग्न कधी आणि कुठे होणार यापासून ते लग्नात जेवायला काय होतं? या सर्व चर्चा झाल्या. पण नुकत्याच झालेल्या लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड शोमध्ये रणवीर सिंगने सुखी वैवाहिक जीवनाचं त्याचं गुपित काय आहे, याचा खुलासा केला.

रणवीर सिंग आणि दीपिका पोदुकोन या दोघांचं एकमेकांवरील प्रेम कधीही कुणापासून लपून राहिलं नाही आणि त्यांनी कधी लपवून ठेवलंही नाही. दोघांच्याही लाजवाब केमिस्ट्रिची उदाहरणे दिली जाऊ लागली. इतकेच नाही तर नवरा असावा तर रणवीर सिंगसारखा प्रेम करणारा असावा, असाही एक सूर सोशल मीडियात बघायला मिळाला. पण लग्न म्हटलं की, चांगल्या गोष्टींसोबतच काही अडचणीही असतातच. आजही अनेकजण सुखी वैवाहिक जीवनाचा फंडा कुठे सापडेल का? याचा शोध घेत असतात. पण हाचं फंडा अगदी सोप्या भाषेत रणवीर सिंगने लोकमतच्या अवॉर्ड शोमध्ये सांगितला. 

रणवीर सिंगला सुखी वैवाहिक जीवनाचा फंडा काय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, 'कोणत्याही गोष्टीत तुमच्याआधी पत्नीला महत्त्व द्या. कोणताही निर्णय घेताना तिला पुढे ठेवा. तसेच तिच्या कोणत्याच गोष्टीला कधीही नाही म्हणून नका. आम्ही दोघेही एकमेकांना समजून घेऊन गोष्टी मॅनेज करतो. मग ते फॅशनबाबत असो वा इतरही कोणत्या गोष्टी करण्याबाबत असो. समतोल महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणानं आवर्जून लग्न करावं, असा सल्लाही मी देतो', अशा शब्दात त्याने त्याच्या सुखी वैवाहिक जीवनाचं गुपित शेअर केला. 

त्यासोबतच हा नोव्हेंबर महिना त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंद देणारा आणि मनभरुन भावूक करणारा ठरला, असंही तो म्हणाला. कारण या लग्नाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये त्याला आनंद, आनंदाचे अश्रू, प्रेम हे सगळं मिळालं. दीपिकाला जसं हवं होतं, तसंच लग्न करण्याची इच्छाही पूर्ण करायला मिळाली, याचाही आनंद त्याच्या बोलण्यातून झळकत होता.   

टॅग्स :Ranveer Singhरणवीर सिंगDeepika Padukoneदीपिका पादुकोणbollywoodबॉलिवूडLokmat Most Stylish Awards 2018लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डस 2018