प्रेमाच्या नात्यात काय जास्त महत्त्वाचं असतं? पार्टनरचा स्वभाव की त्यांची सुंदरता/लूक्स? याचं उत्तर कदाचित अनेकजण हे देतील की, नात्यात केवळ आणि केवळ चांगला स्वभाव आणि एकमेकांना समजून घेणे जास्त महत्त्वाचे असते. पार्टनरचं दिसणं फार महत्त्वाचं नसतं. पण नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, याचं उत्तर वेगळंच मिळालंय.
फ्लोरिडा स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये आयोजित एका रिसर्चच्या निष्कर्षानुसार, पती नात्यात अधिक समाधानी असण्याचं एक मोठं कारण म्हणजे त्याची पत्नी सुंदर दिसणे हे आहे. ऐकायला जरी हे चकीत करणारं असलं तरी रिसर्चच्या निष्कर्षातून हेच समोर आलं आहे.
हवी सुंदर पत्नी
अभ्यासक एंड्रिया मेल्टजरने या शोधात एकूण ४५० कपल्सना सहभागी करुन घेतले होते. या सर्वच कपल्सना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्या वैवाहिक जीवनात ते किती खूश आहेत, कोणत्या मुद्द्यांवर ते पार्टनरवर नाराज होतात, याप्रकारे आणखीही काही प्रश्न विचारण्यात आले. दिवसभरात त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाला १ ते १० दरम्यान रेटींग करायला सांगितलं.
नवऱ्याचा आनंद कशात?
या प्रश्नांच्या उत्तरातून समोर आले की, ज्या पतींकडे सुंदर आणि आकर्षक पत्नी आहे ते आपल्या वैवाहिक जीवनात अधिक आनंदी आहेत. पण पत्नींबाबत याचा रिझल्ट बिलकुल वेगळा आहे. पत्नींना आपल्या पतीच्या लूक्सने फरक पडत नाही. ते हॅंडसम आहेत की, नाही. नात्यात त्यांना या गोष्टींचा काही फरक पडत नाही.
पत्नींना केवळ पतीच्या आनंदाने फरक पडतो. जर पती त्यांच्यावर खूश आहेत तर त्यांच्या आनंद पाहून पत्नी खूश होतात. पण रिसर्चवर विश्वास ठेवायचा तर पतींच्या आनंदाचं एक मोठं कारण पत्नी सुंदर असणे हे आहे.