Relationship : त्याला अजिबात समजू देऊ नका तुमचे ‘हे’ सिक्रेट, अन्यथा !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 12:41 PM
त्याला तुमच्या सर्व नकारात्मक व सकारात्मक गोष्टी माहित असतील तर आताच सावध व्हा, तुमचे नाते धोक्यात येऊ शकते.
तुम्ही त्याच्यासोबत सर्वकाही शेअर करत असाल तर तुमचे स्वातंत्र्य उरणार नाही. त्याला तुमच्या सर्व नकारात्मक व सकारात्मक गोष्टी माहित असतील तर आताच सावध व्हा, तुमचे नाते धोक्यात येऊ शकते.नाती सांभाळणे तारेवरची कसरत असते. जर जोडीदारांमध्ये समंजसपणा असेल तर नाती तुटण्यापासून वाचवता येतात. बहुतांश मुलींना असे वाटते की आपण आपल्या जोडीदाराला सर्वकाही सांगून द्यायला हवे. परंतु असे केल्यास तुमचे नाते तुटण्याची शक्यता वाढते. एकमेकांविषयी पारदर्शकता असणे योग्य आहे. परंतु हा पारदर्शकपणा तुमची पडकी बाजू बनून नाते तुटण्याचे कारण व्हायला नको. यासाठी खालील काही गोष्टींचे पालन केल्यास आपले नाते चिरकाल टिकण्यास मदत होईल, अन्यथा आपण आयुष्यात एकटे पडू शकता. * आपल्या ‘एक्स’विषयी बोलणे तुम्हाला आपल्या एक्स बॉयफ्रेंडची आठवण येत असेल तरी वर्तमानातील जोडीदाराला हे कळू देऊ नका. यामुळे त्याचे मन दुखू शकते.* तुम्हाला त्याच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा नसणे तुम्हाला त्याच्या घरच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा नसेल तर त्याला स्पष्टपणे कारण सांगा. नात्यात प्रामाणिकपणा आवश्यक असतो. त्याला खोटे सांगून तुम्ही त्याच्या घरच्या कार्यक्रमात सहभागी झाला नाहीत, तर त्याला अधिक वाईट वाटेल.* खाजगी क्षणांबाबत इतरांना सांगणेतुमच्या नात्यातील खासगी क्षणांविषयी तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना सांगता ही गोष्ट कोणत्याही जोडीदाराला आवडणार नाही. म्हणून तुमच्या जोडीदारासंबंधित अत्यंत खासगी गोष्टींची वाच्यता आपल्या मित्रांसमोर करू नका. * त्याचा फोन चोरून बघणे प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या जोडीदाराचा फोन तपासून बघण्याचे कुतूहल असते. तुम्हीही जर त्याच्या नकळत त्याचा फोन तपासून बघत असाल तर ही गोष्ट तुमच्यामधील विश्वासाला तडा देणारी ठरू शकते.* पाठलाग करणे जर तुम्हाला मुलांचा पाठलाग करण्याची किंवा नवीन मुलांसोबत टाईमपास करण्याची सवय आहे, तर हे तुमच्या वर्तमान जोडीदाराला मुळीच आवडणार नाही.