शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

तुमच्या एक्सला तुमच्या जीवनात परत यायचंय, या संकेतांवरून ओळखा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 2:19 PM

Relationship Tips : काही लोक असेही असतात की, ते त्यावेळी रागाने तर सोडून गेलेले असतात, पण त्यांना तुमच्या लाइफमध्ये परत यायचं असतं. मात्र, हे कसं ओळखायचं हे अनेकांच्या लक्षात येत नाही. काही संकेतांवरून तुम्ही हे ओळखू शकता?

Relationship Tips : काही नाती फार सहज सोपी असतात, पण काही नाती फारच विस्कळीत आणि हैराण करणारी असतात. खासकरून जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तर स्थिती फार बिकट असते. काही कारणांनी दोन लोक वेगळे होतात. पण काही लोक असेही असतात की, ते त्यावेळी रागाने तर सोडून गेलेले असतात, पण त्यांना तुमच्या लाइफमध्ये परत यायचं असतं. मात्र, हे कसं ओळखायचं हे अनेकांच्या लक्षात येत नाही. काही संकेतांवरून तुम्ही हे ओळखू शकता?

सोशल मीडिया

तुमच्या गर्लफ्रेन्डने जर तुम्हाला सोशल मीडियावर फॉलो करणं बंद केले नसेल. आणि ती अजूनही तुमच्यात आणि तिच्यात काहीच झालं नाही अशी हिंट देण्यासाठी तुमच्या पोस्ट लाइक करत असेल किंवा त्यावर कमेंट करत असेल. तसेच तुमचं ब्रेकअफ होऊनही तिने तुम्हाला ब्लॉक केलं नसेल आणि सतत तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असेल तर तिच्या डोक्यात काहीतरी सुरू असू शकतं. 

मुद्दाम कॉन्टॅक्टमध्ये राहणं

जर ती तुम्ही कसे आहात केवळ हे विचारण्यासाठी फोन करते का? किंवा ती काही विचारण्यासाठी पिंग करते का? तुम्ही काहीही मेसेज न करता तिचा पहिला मेसेज येत असेल, तुमच्याशी बोलण्यासाठी सहज फोन करत असेल किंवा भेटण्याचा  प्रयत्न करत असेल तर हे संकेत आहेत की, तिला तुमच्या आयुष्यात परत यायचं आहे. 

काय बोलता?

तुम्ही दोघे नेमकं काय बोलता याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही दोघे जुन्या चांगल्या आठवणींना उजाळा देता का? किंवा ब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वत:ला कसं सावरलं किंवा ती सतत हिंट देत असेल की, तुम्ही कसे चांगले बॉयफ्रेन्ड होता. तुम्ही तिला पुन्हा हवे आहात याचा हा संकेत असू शकतो. 

ब्रेकअपचं कारण

 तुम्हाला दोघांनाही हे माहीत असतं की, काहीही अर्थ नसलेल्या कारणामुळे तुमचं ब्रेकअप झालेलं असतं. यावर गप्पा होत असतील आणि ती हिंट देत असेल की, अजूनही वेळ गेलेली नाही. या नात्याला पुन्हा एक संधी दिली जाऊ शकते. 

दुसऱ्याला डेट करत नसेल तर...

हा तुमच्यासाठी सर्वात मोठा संकेत ठरू शकतो. ती केवळ तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासोबतच तुम्हाला हिंट देत असेल की, ती दुसऱ्या कुणालाही डेट करत नाहीये. याचा अर्थ तुमची एक्स तुमच्या आयुष्यात परत येण्यासाठी हे सगळं करत आहे. 

तुमच्या लव्ह लाइफबाबत चौकशी करत असेल

हा आणखी एक मोठा संकेत आहे. ती जर तुमच्याबाबत पझेसिव्ह होत असेल आणि तुमच्या मित्रांना तुमच्या लव्ह लाइफबाबत किंवा तुमचं कुणाशी काही सुरू आहे का याची विचारपूस करत असेल तर हा एक मोठा संकेत आहे. तिला तुमच्या आयुष्यात परत यायचं आहे. 

हे असं होत असलं तरी, ती तुमच्या आयुष्यात परत येण्यासाठी आतुर झालेली असली तरी सुद्धा लगेच त्यात पडू नका. तुम्ही विचार करा आणि तुमचा वेळ घ्या. काहीही निर्णय घेण्याआधी दोघेही बोला. ती तुम्हाला परत सोडून जाणार नाही, हे तपासून बघा. तेव्हाच निर्णय घ्या. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप