तुम्ही कधीना कधी कुणाकडून तरी हे ऐकलं असेल की, महिलांना समजनं कठीण काम आहे. त्यांच्या मनात काय सुरु असतं याचा कुणाही अंदाज लावू शकत नाही. पण खरंच महिलांना समजून घेणं इतकं कठीण आहे? या प्रश्नाचं उत्तर कदाचित नाही असं असेल. हे कठीण यासाठी असतं कारण महिला काही गोष्टी पुरूषांना सांगत नाहीत. महिला या गोष्टी त्यांना भीती वाटते म्हणून लपवतात असं नाहीतर त्यांना या गोष्टी केवळ त्यांच्यापर्यंतच ठेवायच्या असतात. चला जाणून घेऊया अशा काही गोष्टी ज्या महिला पुरूषांपासून लपवतात.
सर्व्हेतून झाला खुलासा
एका वेबसाईटने सिंगत आणि रिलेशनशिपमध्ये असलेल्या महिलांवर एक सर्व्हे केला. यात त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही तुमच्या बॉयफ्रेन्डपासून काय लपवता? सुरुवातीला तर कुणीही काहीही उत्तर दिलं नाही. पण नंतर काही महिलांनी यावर उत्तर द्यायला सुरुवात केली.
सवयी
मुलींना त्यांच्या काही सवयी मुलांना सांगणं आवडत नाही. उदा. त्यांना झुरळाची भीती वाटते पण गरम व्हॅक्सची भीती वाटत नाही. सर्वांसमोर काही खाण्याला नकार देतात पण एकट्यात पोटभर खातात. अशा अनेक सवयी असतात ज्या त्यांना मुलांना सांगायच्या नसतात.
आधीच्या नात्याबाबत
मुली या आपल्या बॉयफ्रेन्डला भूतकाळातील रिलेशनशिपबाबत पूर्णपणे काहीही सांगत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडण्याची भीती असते. काही मुली हा विचार करतात की, त्यांच्या जून्या नात्याबाबत बॉयफ्रेन्डला सांगितल्यास त्यांना आवडणार नाही. असे केल्याने सध्याचं नातं बिघडण्याचीही त्यांना भीती असते.
नातेवाईकांबाबत भावना
या सर्व्हेतून खुलासा झाला आहे की, काही मुली या त्यांच्या नातेवाईकांबाबत असलेल्या खऱ्या भावना कधीही कुणाला सांगत नाहीत.
मेकअप किट
जास्तीत जास्त महिला या आपल्या मेकअप किटबाबत पुरूषांना काहीही सांगत नाहीत. त्यांना आपल्या सुंदरतेने पुरूषांना नेहमी सरप्राईज द्यायचं असतं. पण त्यांच्या मेकअप किटबाबत त्यांना काहीही सांगयचं नसतं.
मित्रांचे सिक्रेट्स
महिला या आपल्या बोलण्याच्या मर्यादांबाबत खासकरून पुरूषांना काहीही सांगत नाहीत. काही महिला मित्रांच्या कोणत्याही सिक्रेट गोष्टी पार्टनरला सांगत नाहीत. कारण त्या असा विचार करतात की, या गोष्टींचा आणि त्यांच्या पार्टनरचा काहीही संबंध नाहीये. या गोष्टी पार्टनरला सांगितल्यास त्यांचं नातं अडचणीत येऊ शकतं.