Relationship Tips : रिलेशनशिपबाबत सतत वेगवेगळे रिसर्च समोर येत असतात जे फारच इंटरेस्टींग आणि लोकांसाठी फायदेशीर असतात. असाच एक रिसर्च काही दिवसांआधी करण्यात आला होता. ज्यातून समोर आलं होतं की, कशा व्यक्तीसोबत राहिल्यानंतर तुमचं आयुष्य आणि मेंदुची क्षमता वाढू शकते.
रिसर्चनुसार, एका आशावादी व्यक्तीसोबत रोमॅंटिक रिलेशनशिप असले तर तुमच्या आयुष्याची आणि मेंदूची क्षमता वाढू शकते. कारण आशावादी लोकांचं वागणं हे नेहमी हेल्दी असतं. तसेच एका आशावादी व्यक्ती आपल्या पती किंवा पत्नीसाठी एक चांगलं आणि हेल्दी व्यवहार फॉलो करण्यासाठी एक उत्तम उदाहरण ठरू शकते.
मिशिगन युनिव्हर्सिटीतील अभ्यासकांच्या एका ग्रुपनुसार, जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा तुमचा मेंदू अधिक वेगवान असल्याचं रहस्य यात लपलेलं असतं की, तुमचा जोडीदार किती आशावादी आहे. तुमची समजण्याची क्षमता कोणत्या कारणांमुळे कमी होते किंवा वाढते हे खालील काही गोष्टींवरून बघता येईल.
प्राध्यापक आणि रिसर्चचे मुख्य लेखक विलियम जे चॉपिक यांनी सांगितले की, समजण्याची क्षमता कमी होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. यात आनुवांशिक समस्या, बायोलॉजिकल मार्कर आणि जीवनशैलीची कारणे असतात.
जीवनशैलीसंबंधी कारणांमध्ये शारीरिक हालचाली, पौष्टीक आहार, वजन आणि अधिक सक्रिय असणं यांचा समावेश आहे. एक रूटीन लाइफ जगणं याचाही यात समावेश करता येऊ शकतो. चॉपिक म्हणाले की, जे लोक आशावादी असतात ते आरोग्यदायी व्यवहार जसे की, चांगला आहार, अधिक सक्रिया राहणे आणि प्रिव्हेंटिव हेल्थकेअरशी संबंधित असतात.
कदाचित हेच कारण आहे की, आशावादी असणं ही समजण्याची क्षमता वाढण्यासाठी सर्वात चांगली बाब आहे. तसेच या रिसर्चमध्ये हेही सांगण्यात आलं आहे की, आशावादी व्यक्तीसोबत रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये असल्याने पार्टनरला वेगवेगळे फायदे होतात.