Relationship Tips : जुळवलेल्या लग्नात म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये एक चांगला पार्टनर मिळणं फार अवघड काम असतं. कारण याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडत असतो. अरेंज मॅरेजमध्ये मुलगा आणि मुलीपेक्षा परिवाराची भागीदारी जास्त असते. भारतात असं नेहमी पाहिलं जातं की, मुलापेक्षा परिवाराला मुलगी कशी वाटली हे जाणून घेणं जास्त महत्वाचं असतं. त्यानंतर मुला-मुलीच्या पसंतीबाबत विचारलं जातं.
अरेंज मॅरेजमध्ये एक योग्य जोडीदार मिळाल्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं आणि तुम्ही आनंदी राहू शकता. पण अनेकदा अरेंज मॅरेजमुळे लोकांना जीवनभर समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा बघायला मिळतं की, अरेंज मॅरेजमध्ये जोडीदार निवडताना लोक काही चुका करतात. चला जाणून घेऊ त्या चुका.
अनुरूपतेकडे दुर्लक्ष - अरेंज मॅरेजमध्ये अनेकदा लोक कम्पॅटिबिलिटी म्हणजे अनुरूपतेशिवाय इतर गोष्टींना प्राथमिकता देतात. जसे की, फॅमिली बॅकग्राउंड. सोशल स्टेट्स आणि परिवाराची आर्थिक स्थिती. या गोष्टी बघणं गरजेचं असतं, पण इमोशन, लाइफस्टाईल कम्पॅटिबिलिटीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण या गोष्टींमुळे पुढे जाऊन अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
आपल्या प्रायोरिटीकडे दुर्लक्ष - अनेकदा लोक फॅमिली प्रेशरमध्ये येऊन आपल्या प्राथमिकता आणि ईच्छा इग्नोर करतात. अशात गरजेचं आहे की, लाइफ पार्टनर निवडण्याआधी तुम्ही परिवाराला आधीच आपल्या ईच्छा आणि प्राथमिकता सांगा.
घाईघाईत निर्णय घेणं - अनेकदा लोक एकमेकांना समजून घेतल्याशिवायच घाईघाईने निर्णय घेतात. अनेकदा यासाठी मुलावर किंवा मुलीवर हे नातं जुळवण्यासाठी फॅमिली किंवा बाहेरचे लोक प्रेशर टाकतात. जर तुम्हाला तुमचं अरेंज मॅरेज सक्सेसफुल करायचं असेल तर गरजेचं आहे की, एकमेकांबाबतच्या गोष्टी चांगल्या जाणून घ्या. यासाठी एकमेकांशी बोला.
स्वत: निर्णय न घेणं - अरेंज मॅरेजमध्ये अनेकदा बघायला मिळतं की, मुलगा किंवा मुलगी नात्यासाठीचा निर्णय घेण्याचा अधिकार फॅमिलीला देतात आणि लग्नानंतर काही झालं तर दोषही परिवारालाच दिला जातो. जर तुम्हाला या गोष्टी टाळायच्या असतील तर निर्णय घेताना त्यात तुम्हीही सामिल व्हा.