रिलेशनशीपमध्ये असताना प्रेमासोबतच अनेक धोके पण पत्करावे लागत असतात. कोणत्याही मुलीसोबत अथवा मुलासोबत रिलेशनशीपमध्ये असताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. अनेकदा असं वाटत असतं की आपण खूश राहण्यासाठी एकमेकांपासून वेगळं व्हायला हवं. पार्टनर जेव्हा सोबत असतो तेव्हा त्याचं वागणं बघून आपल्याला खूप त्रास होत असतो.
जर तुम्हाला आपल्या पार्टनर कडून दगा मिळणार आहे असं वाटत असेल तर काही गोष्टींचा वापर करून तुम्ही ते ओळखू शकता. तुमच्या पार्टनरच्या वागण्यात जर काही बदल दिसून येत असेल तर आज आम्ही तुम्हाला ते कसं ओळखायचं हे सांगणार आहोत.
एक्स पार्टनरला दगा दिला असेल
ज्या मुलांनी किंवा मुलींनी काही ठोस कारण नसताना आपल्या एक्स पार्टनरला दगा दिला असेल तर तुम्हाला सुद्धा धोका मिळण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही पार्टनरवर खूप प्रेम करत असता त्यावेळी तुम्हाला त्यांच्या नेहमी चांगल्या गोष्टी दिसत असतात. पण जर गाफिल राहिलात तर तुम्हाला धोका सुद्धा मिळण्याची शक्यता असते. कारण एखादा व्यक्ती आपल्या पहिल्या प्रेमाला नाकारू शकतो. तर तुमच्या बाबतीत पण असं होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरचे आधीच्या गर्लफ्रेन्ड सोबत ब्रेकअप का झाले याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण सध्या्च्या काळात एकापेक्षा जास्त गर्लफ्रेंन्डस ठेवणं ही गोष्ट खूपच कॉमन झाली आहे.
कमी भावनीक असतील
आपण जर एखादया व्यक्तीवर प्रेम करत असू तर त्याचा बाबतीत आपण खूप इमोशनल झालेले असतो. काही लोक हे कमी इमोशनल असतात. ते लोक प्रेम करण्यायपासून सुद्धा लांब राहत असतात. कारण त्यांना कोणत्याही व्यक्तीसोबत असले इमोशनल अटॅचमेंट ही खूप कमी असते. त्यामुळे अशा व्यक्तसोबत जर तुम्ही रिलेशनशीपमध्ये असाल तर तुम्हाला धोका मिळण्याची शक्याता असते. कारण तुम्हाला गमावल्यामुळे त्यांना फारसे वाईट वाटणार नाही. ( हे पण वाचा-ब्रेकअप झाल्याच्या अनेक महिन्यांनीही एक्स पार्टनर तुमच्यावर रागवलाय हे कसं ओळखाल?)
सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणारे
जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या प्रेमात वेडं होण्याआधी काही गोष्टी माहित करून घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जाण्याचा विचार करत असाल तर तो व्यक्ती सोशल मिडियाचा जास्त वापर करत असेल तर तुम्हाला याच गोष्टीचा त्रास होण्याची शक्यता असते. कारण सोशल मीडियाचा अतिवापर केल्यामुळे तुमच्यात नेहमी संवादाची कमतरता भासेल त्यामुळे नातं तुटण्याची सुद्धा शक्यता असते. ( हे पण वाचा-बॉयफ्रेंडचं जगणं मुश्किल करतात या ६ प्रकारच्या गर्लफ्रेंडस्, बघा तुमची आहे का यात! )