Relationship Tips : सामान्यपणे असं मानलं जातं की, मुली आपल्या काही गोष्टी म्हणजे सीक्रेट्स कुणालाही सांगत नाहीत. पण हे असं केवळ मुलीच करतात असं नाही. मुलंही अशा काही गोष्टी लपवून ठेवतात. मुलांना त्या कधीही कुणाला कळू नये असं वाटत असतं. चला जाणून घेऊया मुलांचे सीक्रेट जे कुणालाही कळू नये असं त्यांना वाटतं.
गर्लफ्रेन्डला काय वाटतं?
प्रेमाच्या नात्यात मुलं काहीना काही अंदाज बांधत असतात. ते कसे दिसतात, त्यांची गर्लफ्रेन्ड त्यांच्याबाबत काय विचार करत असेल, त्यांचा लूक किंवा त्यांची बॉडी गर्लफ्रेन्डला आवडत असेल की नाही, या गोष्टी मुलांच्या डोक्यात चालू राहतात. पण या गोष्टी ते कधीही कुणाला सांगत नाहीत.
आधार-दिलासा
बहुदा असे म्हटले जाते की, मुलं स्ट्रॉंग असतात. त्यांना कुणाच्याही आधाराची किंवा मदतीची गरज नसते. पण सत्य वेगळं आहे. मुलांनाही आधाराची, मदतीची गरज असते. पण ते याबाबत कधीही कुणाला सांगत नाहीत. पण कुणी मदत केली किंवा त्यांना आधार तर त्यांना चांगलं वाटतं.
भीती
प्रत्येक मुलीला एक स्ट्रॉंग पार्टनर हवा असतो. मुली झुरळ, पाली, उंदीर, कुत्रे यांची भीती वाटते. पण त्यांना त्यांचा पार्टनर भित्रा नको असतो. या गोष्टींपासून त्यांना वाचवणारा पार्टनर त्यांना हवा असतो. पण भीती वाटत असूनही मुलं आपल्या गर्लफ्रेन्डला कळू देत नाहीत.
सगळं न सांगणं
मुलींना प्रत्येक गोष्टीच्या डिटेल्स जाणून घेणं आवडतं. कोणतही काम करण्याआधी ते कसं करावं आणि कशाप्रकारे यशस्वी करावं याचा विचार मुली करत असतात. त्यांना असं वाटत असतं की, त्यांच्या पार्टनरने सुद्धा तसंच असावं. पण मुलं याबाबत जरा निष्काळजी असतात. पण त्यांना हे त्यांच्या पार्टनरला कळू द्यायचं नसतं.
दुसऱ्या मुलींकडे बघणं
मुलांनी कितीही काही सांगितलं तरी ते पार्टनर सोबत असतानाही दुसऱ्या मुलींकडे बघतात. पण ते तसं करतात. आणि कुणालाही काही सांगत नाहीत. ते या गोष्टींची कुणाला भनकही लागू देत नाहीत.