रिलेशनशिपमध्ये काही दिवसांनी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत चांगलेच कम्फर्टेबल होता. त्यामुळे दोघेही एकमेकांकडे आपल्या मनातील गोष्टी मनमोकळेपणाने बोलतात. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कशाचाही विचार न करता पार्चटनरला काहीही बोलू शकता. तुम्ही कोणत्याही नात्यात असला तरी आणि कितीही राग आला तरी काही शब्दांचा वापर अजिबात करु नये. काही मुली या फार जास्त संवेदनशिल असतात. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवरुन त्यांचं मन दुखतं. अशात तुमचं नातं अडचणीत येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणत्या शब्दांचा किंवा कोणत्या गोष्टी मुलींना म्हणजेच गर्लफ्रेन्डला बोलू नये हे जाणून घेऊया....
1) जास्त भावनिक होण्याची गरज नाहीये
काही मुली फार भावूक असतात. समोर असलेली प्रत्येक परिस्थितीकडे त्या भावनात्मक दृष्टीने बघतात. पण जर कधी भांडण झालं असेल आणि रागाच्या भरात म्हणत असाल की, इमोशनल होऊ नको, प्रॅक्टिकल होऊ नको, तर त्यांना या गोष्टींचं वाईट वाटू शकतं. अशा बोलण्याने तुमच्या नात्यात मिठाचा खडा पडू शकतो.
2) तू फार जास्त विचार करते
संवेदनशील मुली प्रत्येक गोष्टीचा फार विचार करतात. त्यांच्यामुळे, त्यांच्या वागण्यामुळे कुणाला वाईट वाटू नये याचा विचार त्या करतात. हा सगळा विचार करुनच त्या सर्व निर्णय घेतात. पण भांडण झाल्यावर बॉयफ्रेन्ड त्यांना तू जरा जास्तच विचार करते, प्रॅक्टिकल होत नाही, असे बोललात तर त्यांच्या मनाला ते लागतं. कारण त्यांच्यानुसार परिस्थितीच्या प्रत्येक बाजूचा विचार करणे चुकीचे नाहीये.
3) फास्ट फॉरवर्ड हो!
संवेदनशील मुली कधीही कोणतही काम घाईत करत नाहीत. त्या त्यांना हवा असलेला वेळ घेऊनच कोणत्याही गोष्टीवर रिअॅक्ट होतात. तर त्यांना कुणी म्हटलं की, तुला एकही काम पटकन करता येत नाही, तू जरा फास्ट हो...तर या गोष्टीने त्यांना वाईट वाटतं. त्यांचा हा स्वभाव बॉयफ्रेन्डने समजन घ्यायला हवा. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करु नये.
4) आकर्षणासाठी अशी वागते
जर तुमची संवेदनशील गर्लफ्रेन्ड निर्णय घ्यायला थोडा वेळ लावत असेल आणि तिला वाटत असेल की, त्या गोष्टीत तिला तुमची साथ हवी तर समजा की, तिला तुमचं अटेंशन हवंय. अशा मुलींना तुमचं अटेंशन हवं असतं त्या आकर्षणाच्या भूकेल्या नसतात. त्यांच्या स्वभावाचा विचार न करता काहीही बोलू नये.
5) मला तुझा कंटाळा आलाय
जर तुम्ही गर्लफ्रेन्डसोबत भावनात्मक रुपाने जोडले गेले नसाल तर याचा दोष त्यांना देऊ नका. कधी भांडण झालंच तर त्यांना कधीही 'मला तुझा कंटाळा आलाय' असं म्हणू नका. अशाप्रकारे बोलल्यास तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं.