(Image Credit: www.yogajournal.com)
प्रत्येकालाच आपल्या पार्टनरमध्ये वेगवेगळ्या क्वॉलिटी असण्याची अपेक्षा असते, पण यातील काही अशा असता ज्या फार कॉमन असतात. हे गुण प्रत्येक मुलीला आपल्या पार्टनरमध्ये हवे असतात. उदाहरण द्यायचं तर त्यांना वाटत असतं की, त्यांचा पार्टनर रोमॅंटिक असावा. त्याशिवायही आणखीही काही खास गोष्टी आहेत ज्या मुलींना आपल्या पार्टनरमध्ये हव्या असतात.
१) कपाळावर किस करणे
पार्टनरची ही गोष्ट मुलींना फार दिलासा देते. कारण या किसमध्ये शारीरिक संबंधाची नाही तर काळजीची भावना आणि प्रेम असतं. मुलींना पार्टनरने असं करावा अशी त्यांची इच्छा असते. कपाळावर किस करणे प्रेम, सुरक्षा, आनंद याचं प्रतिक मानलं जातं.
२) हात धरणे
भेटल्यावर चालता चालता हातात घेणे मुलींना फार रोमॅंटिक वाटतं. असं केल्याने त्यांना त्यांना स्पेशल फिल होतं. पार्टनरच्या या गोष्टीमुळे मुली स्वत:ला सुरक्षित फिल करतात.
३) तारखा लक्षात ठेवणे
पहिल्यांदा कधी भेटलो, कोणत्या दिवशी नात्याला नाव मिळालं, वाढदिवस अशा काही खास तारखा जर पार्टनरला लक्षात असतील तर मुली फार आनंदी होतात. कारण त्यांच्यासाठी ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात.
४) पत्र लिहिणे
आता भलेही वेगवेगळ्या गॅझेट्सचा जमाना असला तरी मुलींची अशी अपेक्षा असते की, त्यांच्या पार्टनरने वेगळ्याप्रकारे प्रेम व्यक्त करावं. अशात पत्र लिहिण्यापेक्षा खास असू शकत नाही. हा प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात रोमॅटिक प्रकार मानला जातो. जर पार्टनरला कविता किंवा शायरी येत असेल तर विचारायलाच नको. कारण मुलींना त्यांच्यासाठी कविता लिहिणे, त्यातून त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करणे फार पसंत असतं.
५) हॅंड-मेड गिफ्ट
दुकानातून खरेदी करुन कुणीही गिफ्ट देतात. पण स्वत:च्या हाताने जर पार्टनर कोणतही गिफ्ट दिलं तर ते मुलींना आवडतं. जर यात मुलीच्या पसंतीचा विचार केला गेला असेल तर त्यांना अधिक आनंद होतो.
६) अचानक भेटणे
ऑफिस सुटल्यावर अचानक पार्टनर त्यांना घेण्यासाठी येत असेल किंवा भेटायला येत असेल तर मुलींना फार आवडतं. अशा गोष्टींमधून त्यांना स्पेशल फिल होतं.
७) वेळोवेळी मिळणारा सपोर्ट
जर पार्टनर आपल्या गर्लफ्रेन्डला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करत असेल. काय चूक काय बरोबर हे समजावून सांगत असेल तर मुलींना ही गोष्टी फार आवडते.