Relationship Tips : सुरूवातीला चांगलं वाटणारं प्रेमाच नातं नंतर वेगळ्याच वळणावर जातं. एकमेकांना माहीत नसलेल्या गोष्टी समोर येऊ लागतात. तेव्हा नातं किचकट होतं. वाद वाढले की, पार्टनर सोबत असूनही तुम्हाला एकटं वाटू लागतं. त्या नात्यात मग काही अर्थ उरलेला नसतो. अशात वेळीच जर त्यावर काही विचार केला नाही, तर दोघांचही जगणं कठीण होऊन बसतं. चला जाणून घेऊया अशीच काही लक्षण ज्यावरुन तुम्हा दोघात आता आधीसारखं प्रेम राहीलं नाही हे कळू शकतं.
चिडचिडपणा वाढणे
जर तुमच्या पार्टनरची प्रत्येक कामात चिडचिड होत असेल, तुम्हाला टोमणे मारत असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवरुन मोठ मोठी भांडणं होत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. असेही असू शकते की, त्याचा/तिचा मूड ठिक नसेल, पण अशा गोष्टी जर पुन्हा पुन्हा होत असतील तर अशा नात्याला किती पुढे घेऊन जायचं याचा विचार करायला हवा.
स्वाभिमान न जपणे
कोणत्याही नात्याप्रमाणे प्रेमाच्या नात्यातही ऐकमेकांचा सन्मान करणं महत्वाचं असतं. दोघांचही महत्व सारखं असतं. तुम्ही कोणत्या ना कोणत्या रुपात ऐकमेकांना मदतच करत असता. पण जर तो किंवा ती तुम्हाला कमी लेखत असेल किंवा तुमचा सतत अपमान करत असेल तर तुम्हाला वेळीच या नात्याबद्दल विचार करणे फायद्याचं ठरेल.
नात्यात नाटकीपणा
तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत कम्फर्टेबल वाटत नसेल किंवा तुम्हाला माहीत आहे की, सगळं काही ठिक आहे पण काही गोष्टी जबरदस्तीने मान्य करुन तुम्ही आनंदी असल्याचा अभिनय करण्याचा प्रयत्न करत आहात, तर वेळीच याचा विचार करा. खोटं आणि दिखावा असलेलं नातं फार काळ टिकत नाही.
ऐकमेकांना टाळणं
जर तुम्ही विचार करता की, उगाच विषय वाढेल किंवा त्याचा/तिचा मूड ठिक नसल्याने त्याच्या/तिच्याकडे जाण्याची भीती वाटत असेल. किंवा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऐकमेकांना टाळत असाल तर ते नातं तिथेच संपवलेलं बरं.
केवळ आठवणी
जेव्हा तुम्ही विचार करता की, आधी तुम्ही दोघे किती आनंदी, सकारात्मक, उत्साही आणि मोकळे राहत होते. वेळेनुसार ते नातं पूर्णपणे बदललं आहे. जेव्हा पार्टनर सोबत असतो तरी तुम्ही आनंदी राहत नसाल आणि तुम्हाला काहीही बोलण्याआधी विचार करावा लागत असेल तर हे ते नातं संपल्याची लक्षणे आहेत.