Relationship : आजकाल एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या अनेक घटना समोर येत असतात. ज्या फारच अजब असतात. कधी कधी तर नात्यांचा गुंता इतका भयंकर असतो यावरही विश्वास बसत नाही. महिला असो वा पुरूष अशा नात्यात अडकले की, त्यांच्या वागण्यात फरक बघायला मिळतो. ज्यावरून तुम्ही त्या व्यक्तीच्या मनात किंवा जीवनात काय सुरू आहे हे ओळखू शकता. जर एखादी व्यक्ती ऑनलाइन अफेअरमध्ये असे तर त्याची काही लक्षणे दिसतात. जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
झोपण्याची पद्धत
सामान्यपणे जे लोक ऑनलाइन अॅक्टिविटीमध्ये गुंतलेले असतात त्यातील जास्तीत जास्त लोक रात्री उशीरापर्यंत जागी असतात. जर त्यांचं काही सुरू असेल तर असे लोक हे रात्रभर ऑनलाइन टाईमपास करत असतात. ऑनलाइन कुणाशी चॅटींग करत असताना त्या व्यक्तीचं कशात काही लक्ष राहत नाही. ते त्यांच्या विश्वात हरवलेले असतात.
फोन-लॅपटॉपला हात न लावू देणे
जर तुमच्या पार्टनरचं ऑनलाइन अफेअर सुरू असेल तर ती व्यक्ती त्यांचा फोन, टॅबलेट आणि लॅपटॉप सर्वांपासून दूर ठेवतात. त्याला कुणालाही हात लावू देत नाहीत. ते कधीही फोनवर एखाद्या कोपऱ्यात बघायला मिळतात. इतकेच काय तर ते फोनचा पासवर्डही बदलतात. अशात जर तुम्ही त्यांचा फोन चेक केला तर त्यांना राग येतो.
घरात दुर्लक्ष
तुमची फसवणूक करणारा तुमचा पार्टनर जास्तीत जास्त वेळ ऑनलाइन राहतो तेव्हा तेव्हा ते घरातील कामांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या सोडून ते भलतीकडेच लक्ष देत आहेत.
गोष्टी लपवणे
जे पार्टनर फसवणूक करतात ते सतत काहीतरी लपवत असतात. ते त्यांचे क्रेडिट कार्ड बिल्स, डेटिंग साइट्स किंवा अॅडल्ट साइट्स लपवण्याचा प्रयत्न करतात. ते गोष्टी लपवण्यासाठी खोटं बोलतात.
व्यवहारात बदल
जर त्यांचं कुठे काही सुरू असेल तर त्यांच्या वागण्यात फार बदल बघायला मिळतो. जर तो शांत असेल तर आनंदी राहील किंवा अचानक फार उत्तेजित होईल.