रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर अनेक प्रसंगाचा सामना प्रत्येक कपल्सला करावा लागत असतो. असं वाटत असतं की आपण खूश कसं राहू शकतो. किंवा एकटेपणा कसा दूर करू शकतो. पार्टनर असूनही खूप इन्सिक्योर वाटत असतं. पार्टनर आपल्याशी खोटं बोलतोय का अशी शंका सतत येत असते.
कारण रिलेशनशिपमध्ये असताना मुलगा किंवा मुलगी सगळं काही सहन करू शकतात. पण पार्टनरकडून धोका मिळणं ही गोष्ट अजिबात सहन होणारी नसते. आज आम्ही तुम्हाला अशी काही लक्षणं सांगणार आहोत. ज्यावरून तुम्हाला तुमचा पार्टनर जर धोका देत असेल तर लगेच लक्षात येईल.
एक्स पार्टनरला धोका दिला असेल
जर तुमच्या पार्टनरने आधीच्या पार्टनरला धोका दिला असेल आणि त्याचं काही ठोस कारण नसेल तर तुम्हाला सुद्धा काही काळानंतर धोका मिळू शकतो. त्यामुळे पार्टनरच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता तुम्ही जर खरचं राहू इच्छित असाल तर एक्स पार्टनरबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला ब्रेकअपचा सामना करावा लागू शकतो.
कमी इमोशन्स असलेले लोक
काही लोक हे प्रेमात खूप वाहावत जातात. तर काहीजण खूप जास्त इमोशनल होतात. पण काहीजण इमोशनल नसतात. प्रेमाचा खरा आनंद सुद्धा घेऊ शकत नाही असे लोक आपल्या पार्टनरसोबत मनाने जास्त जवळ असतात. म्हणून असे लोक पार्टनरला कधीही धोका देऊ शकतात. अशा माणसांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला कधीही धोका मिळू शकतो. ( हे पण वाचा- इंटरकल्चर रिलेशनशिपमधील समस्यांना 'या' सोप्या उपायांना करा हॅण्डल)
सोशल मीडियाचा अतिवापर
सोशल मीडियाचा अधिक वापर करणारे मुलं आपल्या नात्याला जपण्यापेक्षा सोशल मीडीयावर प्रेम करणारे असतात पार्टनरला गमावण्याची भीती त्यांना वाटत नाही. पार्टनर असताना सुद्धा इतर मुलींशी फ्लर्टींग करणं वाढत जातं. त्यामुळे तुमचा पार्टनर जर तुमच्यासोबत असताना सुद्धा सोशल मीडियाचा अतिवापर करत असेल तर ब्रेकअपचं कारण ठरू शकतं. कारण कोणत्याही मुलीच्या किंवा मुलाच्या प्रेमात वेडं होण्याआधी या गोष्टी माहित असायलाच हव्यात नाहीतर मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-मुली फ्लर्ट करत असतील तर, 'या' सिक्रेट टिप्सनी ओळखा)