अनेक कपल्सचं नातं फार सुंदर असतं, पण काही कपल्सचे स्वभाव जुळत नाही, तर सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडत राहतात. अशातच कपल्समध्ये काही गोष्टी योग्य पद्धतीने सुरू राहत नाहीत. त्यावेळी नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. एवढचं नाहीतर नातं तुटण्याचीही शक्यता निर्माण होते. असं होण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, दोघांचा स्वभाव किंवा पर्सनॅलिटी फार वेगळी असते.
असं सांगितलं जातं की, आपला स्वभाव काही राशींवरून समजणं शक्य असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही राशींबाबत सांगणार आहोत. ज्यांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. तसेच जर अशा राशींच्या व्यक्ती एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार करत असतील तर त्यांच्या नात्यामध्ये अनेक चढ-उतार येऊ लागतात. जाणून घेऊयात अशाच काही राशींबाबत...
नात्यामध्ये येण्याआधी कोणीही राशींचा फारसा विचार करत नाही. परंतु, नातं पुढे नेण्यासाठी आणि नात्यामधील भांडणांपासून बचाव करण्यासाठी राशी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक असतं. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
जाणून घेऊया कोणत्या राशीच्या जोड्यांचं नातं जास्त वेळापर्यंत टिकू शकत नाही.
मेष राशी आणि कर्क राशी
मेष राशीच्या व्यक्ती पारच केअरिंग असतात. या व्यक्ती सतत एखाद्या गोष्टीची काळजी करत बसतात. पण याउलट कर्क राशीच्या व्यक्ती सतत आपल्याबाबतच विचार करत असतात. असं सांगितलं जातं की, याच कारणामुले या दोन्ही राशींच्या व्यक्तींमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून खटके उडत असतात. अनकेदा ही भांडणं नातं तुटण्यासही कारणीभूत ठरतात.
वृषभ राशी आणि सिंह राशी
असं सांगितलं जातं की, या दोन्ही राशींच्या व्यक्ती मर्यादेपेक्षा जास्त रागीट असतात. यांच्या नात्यामध्ये भांडण होण्याची सर्वा मोठी कारणं म्हणजे, यांचा हट्ट आणि अहंकार. जेव्हा दोन्ही व्यक्तीं रागात असतात. त्यावेळी कोणीही एकमेकांचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतं. त्यामुळे या दोन राशींच्या व्यक्तींचं नातं फार काळ टिकत नाही.
मिथुन राशी आणि कन्या राशी
कन्या आणि मिथुन राशीच्या व्यक्तींची पर्सनॅलिटी एकमेकांपेक्षा वेगळी असते. असं सांगितलं जातं की, कन्या राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करतात. याउलट मिथून राशीच्या व्यक्तींना प्रत्येक बाबतीत स्वातंत्र्य पाहिजे असतं. त्यामुळे यांचा ताळमेळ अजिबात बसत नाही आणि दोघेही वेगळं होण्याचा विचार करतात.
कर्क राशी आणि तूळ राशी
कर्क राशीच्या व्यक्तींना इतरांची काळजी घ्यायला फार आवडते. परंतु, तूळ राशीच्या व्यक्तींना त्यांचं असं वागणं म्हणजे, त्यांच्यावर केलेली जबरदस्ती वाटत असते. त्यामुळे त्यांचं नातं आपली ओळख निर्माण करू शकत नाही.
मकर राशी आणि तूळ राशी
मकर राशीच्या व्यक्तींना अनावश्यक गोष्टींबाबत चर्चा करायला अजिबात आवडत नाही. तसेच तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीचा आनंद अनुभवणं फार आवडतं. असं सांगितलं जातं की, स्वभाव अगदी विरूद्ध असल्यामुळे या राशीच्या लोकांचं नातं फार काळ टिकू शकत नाही.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही.)