शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
3
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
4
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
5
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
6
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
7
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
8
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
9
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
10
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
11
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
12
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
13
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
14
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
15
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
16
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
17
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
18
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
19
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
20
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 

समोरच्याकडून प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळत नसेल तर काय करायला हवं? जाणून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 4:54 PM

Relationship : जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये असता तेव्हा सुरूवातीला एकमेकांच्या सर्वच गोष्टी चांगल्या वाटू लागतात. पण बदलत्या वेळेनुसार, परिस्थितीही बदलते. 

Relationship : एखाद्याच्या आयुष्यात नको असलेली व्यक्ती होणे फारच त्रासदायक असतं. तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत आनंदाने जीवन जगायचं असतं, पण तोच उत्साह तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या व्यवहारातून दिसत नसतो. हे तर सर्वांनाच माहीत असतं की, रिलेशनशिप यशस्वी ठेवण्यासाठी दोघांनाही पुढाकार घ्यावा लागत असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये असता तेव्हा सुरूवातीला एकमेकांच्या सर्वच गोष्टी चांगल्या वाटू लागतात. पण बदलत्या वेळेनुसार, परिस्थितीही बदलते. 

असंही झालं असेल की, तुम्ही स्वत: त्या स्थितीमध्ये पोहोचले असाल. तुम्ही तुमचा सगळा वेळ केवळ तुमच्या पार्टनरला दिली असेल. पण तसं समोरून झालं नसेल तर तुम्हाला स्वत: विचित्र अडचणीत अडकल्यासारखं वाटतं. अशात हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

जर तुम्ही अशाच काहीशा स्थितीचा सामना करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. यात सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, काय खरंच तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी नकोसे झाले आहात? अशात काय करता येऊ शकतं हे जाणून घेऊ.

अशात काय करावं?

अशी परिस्थिती जर समोर असेल तर तुम्ही परिस्थितीला मान्य केल्याशिवाय काही करू शकत नाही. तुम्हाला हे समजून यायला हवं की, तुम्हाला हवं असलेलं प्रेम हे नाही. जेव्हा समोरून याचा खुलासा होईल त्यावेळी अधिकच वाईट वाटेल आणि दु:ख होईल. दोन्हीकडून त्रास तुम्हालाच होणार आहे. 

स्वत:ला माफ करा

सर्वातआधी तर या नात्यात येण्यासाठी स्वत:ला माफ करा. या रिलेशनमधून बाहेर येण्याचा पूर्ण प्रयत्न करा. घाई अजिबात करू नका. यातून सहजासहजी बाहेर पडता येत नाही. पण त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. 

एकट्याने हे ओझं सहन करणं टाळा

तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, हे ते साधं ओझं नाहीये जे तुम्ही एकट्याने सहन करू शकाल. यासाठी तुम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची मदत घेऊ शकता. तसेच हे नातं यशस्वी झालं नाही म्हणजे तुम्ही पुन्हा प्रेम करू शकत नाही किंवा तुम्हाला कुणी प्रेम करणारं मिळणार नाही असं नाहीये. आयुष्याच्या वळणांवर तुम्हालाही प्रेम मिळेल.

दुरावा ठेवा

पार्टनरसोबत दुरावा ठेवायला सुरूवात करा. तुम्ही पार्टनरपासून दूर गेल्याशिवाय यातून बाहेर पडूच शकत नाही. जर तुमचं खरंच प्रेम असेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर जबरदस्तीने स्वत:ला लादू शकत नाही. 

प्रेमावर ठेवा विश्वास

एकदा वाईट अनुभव आल्यावर तुम्ही हार मानू नये. प्रेमाच्या शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. त्यानेच तुमचा त्रास कमी होईल. प्रेमावरील विश्वास उडू देऊ नका. 

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप