(Image Credit : eldiariony.com)
कुणाला डेटसाठी विचारणे हे तसं सोपं काम नाहीये. अनोळखी किंवा जास्त ओळख नसलेल्या व्यक्तीला डेटसाठी विचारणं हे आणखीनच कठीण होऊन बसतं. पण ही एक कला आहे. त्यासाठी काही टिप्स फॉलो केल्यात तर तुम्हाला मदत होऊ शकते.
डेटसाठी विचारण्याचा खास अंदाज
जास्त ओळख नसलेल्या व्यक्तीला डेटसाठी विचारायचं असेल तर प्रपोजल अॅक्सेप्ट न झाल्यास लाजिरवाणं वाटू शकतं. पण त्यासोबतच प्रपोजलची पद्धत काय असावी याचाही विचार असतो. डेटसाठी विचारण्याचा अंदाज असा असला पाहिजे की, समोरच्याने नकार देताच कामा नये. अशाच काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
बेट लावा
ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला डेटला जायचं आहे त्या व्यक्तीसोबत मजेदार बेट लावा. या बेटमध्ये हरणाऱ्या व्यक्तीला जिंकणाऱ्यासोबत डेटला जावं लागेल. पण हे लक्षात ठेवा की, बेट अशीच लावा ज्यात तुम्ही जिंकणार असा तुम्हाला विश्वास असला पाहिजे. असे न झाल्यास तुमचा प्लॅन फेल होऊ शकतो.
इमोजींचा वापर करा
डेटसाठी विचारणा करण्यासाठी इमोजींचा वापर चांगला पर्याय ठरु शकतो. गर्ल इमोजी, बॉय इमोजी, कॉफी इमोजी आणि प्रश्नार्थक चिन्ह यांच्या मदतीने तुम्ही त्या व्यक्तीला डेटसाठी विचारणा करु शकता.
पुस्तकात शब्दांना हायलाईट करणे
हा फंडा अगदीच नवीन आणि यूनिक आहे. तुम्ही पुस्तकात ते शब्द हायलाईट करा ज्यातून तुम्ही समोरच्या व्यक्तीला डेटसाठी विचारणा करु शकता. हा फंडा तेव्हाच आणखी मजेदार होईल जेव्हा त्या व्यक्तीला पुस्तकांमध्ये इंटरेस्ट असेल.
दुसऱ्यांची मदत
ही आयडिया फारच अॅडव्हेंचरस आहे. तुम्ही चालता फिरता अनोळखी लोकांची मदतही घेऊ शकता. यासाठी तुम्हाला काही मोठ्या मनाने दिलखुलास लोक शोधावे लागतील. एखाद्या मजेदार पद्धतीने त्यांच्या व्दारेही तुम्ही डेटचं प्रपोजल पाठवू शकता.
खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा वापर
कुणाला डेटसाठी विचारणा करायची असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी काहीतरी खास तयार करुन घेऊन जाऊ शकता. अशी अनेक दुकाने आहेत जी तुम्हाला खास गोष्टी बनवून देऊ शकतात. केक ऑर्डर करणे हाही एक चांगला पर्याय आहे.