(Image Credit : https://www.mortgagebrokernews.ca)
आपल्या आयुष्यात आनंदाचं वेगवेगळं महत्त्व आहे. खुश राहण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. तसेच आनंदाची वेगवेगळी कारणं असतात. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की, लग्नानंतर महिला नवरा आणि मुलांमध्ये रमतात आणि जास्त खूश असतात. परंतु तुमचा हा विचार अत्यंत चुकीचा ठरवाल आहे एका संशोधनाने.संशोधनातून सिद्ध झालेल्या बाबींनुसार, महिला लग्नानंतर खूश नसून त्या लग्न न करता जास्त खूश असतात. महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनातून त्यांच्या आनंदी राहण्याची अनेक कारणं समोर आली.
(Image Credit : https://www.pexels.com)
अमेरिकन टाइम यूज सर्वेने केलेल्या संशोधनातून विवाहित, अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांच्या सुखाची आणि दुखःची वेगवेगळ्या स्तरांवर तुलना करण्यात आली. सर्वात आश्चर्यकारक बाब समोर आली ती म्हणजे, विवाहित महिलांना जेव्हा त्यांच्या जोडीदारासमोर सुखाबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आनंदी असल्याचं सांगितलं. सर्व निरिक्षणांमधून असं समोर आलं की, अविवाहित महिलांची विवाहित महिलांच्या तुलनेत दुखः यादी अत्यंत कमी होती.
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधील व्यवहार विज्ञान प्रोफेसर आणि 'हॅप्पी एवर आफ्टर' पुस्तकाचे लेखर पॉल डोलन यांनी सांगितले की, लग्नामुळे पुरूषांना फायदा होतो आणि महिला लग्नाआधी जास्त खूश राहत असतं. डोलन यांनी याच संशोधनाबाबत बोलताना सांगितले की, अनेक पुरूष लग्नानंतर शांत होतात. त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभतं.
पण महिलांबाबत अत्यंत उलट असतं. लग्न झाल्यानंतर त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. जर त्या लग्न करत नसतील तर त्या निरोगी आणि आनंदी राहतात. मार्केटिंग इंटेलिजेंस कंपनी मिंटेलद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनात एकट्या राहणाऱ्या महिलांवर काही निरिक्षणं नोंदवण्यात आली. एकूण महिलांपैकी 61 टक्के महिला आनंदी आहेत. तसचे यातील 75 टक्के महिला एकट्याच राहणं पसंत करतात. त्यांना जोडीदाराची अजिबात गरज नसते.
संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष सांगतात की, सध्या परिस्थिती बदललेली आहे. तसेच विचारसरणीही बदलत आहे. त्यामुळे लग्न आणि मुलं या दोनच गोष्टी महिलांना आनंदी नाही करत. आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या नाही, हे ठरविण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे.
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.