आपल्या राशींवरून आपला स्वभाव समजू शकतो हे तर आपण सारेच जाणतो. पण तुम्ही कधी समुद्र शास्त्राबाबत ऐकलं आहे का? समुद्र शास्त्राचा आधार घेऊन तुम्ही स्वतःबाबत किंवा इतरांबाबत अनेक गोष्टी माहिती करून घेऊ शकता. खरं तर समुद्र शास्त्रात फेस रिडिंग, ऑरा रिडिंग आणि पूर्ण शरीराचं निरीक्षण केलं जातं. त्याचप्रमाणे यामध्ये आपल्या शरीरावर असणाऱ्या तीळांचंही महत्त्व सविस्तर सांगण्यात आलं आहे.
समुद्रशास्त्रानुसार, आपल्या शरीरावर असणाऱ्या तिळाचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. त्या तिळाचं आपल्या शरीरावर नेमकं स्थान कुठे आहे? यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखणं शक्य असतं, असं सांगण्यात येतं. जाणून घेऊया सविस्तर...
समुद्रशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की, ज्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या खाली नाकावर तीळ असतो, त्या व्यक्ती फार कमी बोलणाऱ्या असतात. तसेच त्या व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी कोणालाच सांगत नाहीत.
असं सांगण्यात येतं की, ज्या व्यक्तींच्या हनुवटीवर तीळ असतो त्यांना कधीच पैशांची चणचण भासत नाही. कारण त्या फार मेहनती असतात. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी त्या सर्वोतोपरी प्रत्न करत असतात.
समुद्रशास्त्रानुसार असं सांगण्यात येतं की, नाभीजवळ तीळ असलेल्या व्यक्ती फार धनवान असतात.