उंदराच्या वासामुळे शेन वॉर्न अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2016 7:40 AM
वॉर्न क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी अवली अन् साहसी स्वभाव त्याला स्वस्थ कसा बसू देणार?
शेन वॉर्न या अवलियाला ओळखत नाही, असा क्रिकेटप्रेमी जगात आढळणे दुर्मिळच. मैदानावरील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील ‘करामतीं’मुळेही तो कायम क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहिलाय. तर असा हा वॉर्न क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी अवली अन् साहसी स्वभाव त्याला स्वस्थ कसा बसू देणार? आॅस्ट्रेलियाचा हा दिग्गज क्रिकेटपटू अलीकडे ‘आय अॅम अ सेलिब्रिटी, गेट मी आऊट आॅफ हिअर’ या रियालिटी टीव्ही शोमध्ये सहभागी झाला होता. यात त्याच्यासोबत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. आपल्या फिरकीच्या तालावर जगभरातील फलंदाजांना नाचवणारा हा कसलेला लेग स्पिनर अॅनाकोंडा जातीच्या सापाच्या तावडीत अडकला होता. सुदैवाने तो साप विषारी नसल्याने जखमेवर निभावले. या दुर्घटनेत वॉर्नच्या चेहºयाला दुखापत झाली. या शोमध्ये स्पर्धकाला प्राणी भरलेल्या बॉक्समध्ये काही वेळासाठी तोंड घालायचे होते. बेडूक, विंचू, झुरळ आणि उंदिरांच्या बॉक्समध्ये वॉर्नने ही क्रिया यशस्वीपणे केली. मात्र, सापांच्या बॉक्समध्ये तोंड घालताना त्याला ही दुखापत झाली. त्यामध्ये अॅनाकोंडासह रॅट स्नेक आणि इतर सापांचाही समावेश होता. या बॉक्सआधी वॉर्नने उंदरांच्या बॉक्समध्ये तोंड घातले होते.उंदरांच्या वासामुळे अॅनाकोंडा वॉर्नच्या तोंडकडे आकर्षित झाला असावा, असा तर्क लावण्यात येत आहे. हा साप चावला म्हणजे १०० सूर्या एकाच वेळी टोचल्यासारख्या वेदना होता. असे असले तरी, वॉर्नवर वेळीच योग्य उपचार झाले असून त्याची प्रकृती सामान्य असल्याचे समजते.