SHOCKING : मुली आपल्या पार्टनरशी लपवितात ‘या’ गोष्टी !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 11:15 AM
नात्यात काही बाधा येऊ नये म्हणून मुली सुरुवातीला आपले काही सिक्रेट्स पार्टनरला अजिबात सांगत नाही. आज आपण त्याबाबत जाणून घेऊया की, मुली नेमक्या कोणत्या गोष्टी लवपून ठेवतात.
मुलींना समजणे खूपच कठीण असते. त्याच्या मनात कधी आणि कोणता विचार येईल हे एक मोठ्या रहस्यासारखे आहे. जेव्हा मुलगा-मुलगी रिलेशनशिपमध्ये येतात तेव्हा नात्यात काही बाधा येऊ नये म्हणून मुली सुरुवातीला आपले काही सिक्रेट्स पार्टनरला अजिबात सांगत नाही. आज आपण त्याबाबत जाणून घेऊया की, मुली नेमक्या कोणत्या गोष्टी लवपून ठेवतात. * पुर्वीचे नाते बहुतांश मुला-मुलींचे लग्नाअगोदर एखाद्याशी तरी नाते असते, मात्र ही गोष्ट मुली आपल्या पार्टनरला कधीच सांगत नाही. मुलीचे जर लग्न झाले असेल आणि तिने जर आपल्या पुर्वीच्या नात्याबाबत पार्टनरला सांगितले तर लग्न तुटू शकते अशी भीति तिच्या मनात असते, तसेच मुलगी अविवाहित असेल आणि ती नुकतिच एखाद्या मुलाच्या रिलेशनशिपमध्ये असेल तरीही ती सध्याचे नाते तुटू नये म्हणून पुर्वीच्या नात्याबाबत काहीच सांगत नाही. जर मुलींना याबाबत विचारले तरीही त्या याबाबत काहीच सांगत नाहीत. * बंधिस्त नाते बहुतांश मुलींना आपल्या ब्वॉयफ्रेंडसोबत बंधिस्त नात्यात राहणे आवडत नाही, त्यांना मनमोकळे जगण्याची सवय असते यामुळे त्या कुणाचा दबावदेखील सहन करत नाही. मात्र ही गोष्ट ती आपल्या पार्टनरला सांगू शकत नाही, कारण असे तिच्या पार्टनरला आवडणार नाही आणि तो असे नाते पुढे वाढवू शकत नाही. * मेकअपची सवय मुली आपले सौंदर्य वाढविण्यासाठी बऱ्याच प्रकारचे सौंदर्य प्रसाधने वापरतात. त्यांचा प्रत्येक महिन्याला मेकअपवर खूपच खर्च होत असतो मात्र याबाबत ती आपल्या पार्टनरला काहीच सांगत नाही आणि आपले सौंदर्य हे नैसर्गिक आहे, असे भासविण्याचा प्रयत्न करते. * प्रत्येक मुलावर क्रश काही मुली प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी एखाद्या हॅँडसम मुलाच्या बाबतीत विचार करु लागतात. एखादी पार्टी किंवा आॅफिसमध्ये सोबत काम करणारा सहकारीतर्फे आकर्षित होणे मुलींसाठी सामान्य गोष्ट आहे, मात्र तिच्या मनात येणाºया या विचारांबाबत ती आपल्या पार्टनरला कधीही सांगत नाही. Also Read : Relation : मुलांमधील या ‘५’ सवयींमुळे मुली पळतात दूर ! : OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !