भावा-बहिणीचं नातं हे सगळ्या नात्यांपेक्षा वेगळं आणि प्रेमळं नातं समजलं जातं. यामध्ये एकमेकांसाठी प्रेम असतं, पण त्याचबरोबर दंगा-मस्ती आणि प्रेमळ रागही असतो. परिस्थिती कशीही असो, यांच्यामधील प्रेम आणि लाडीक भांडणांमध्ये अजिबात बदल होत नाहीत. आज सिब्लिंग डे आहे. म्हणजेच, एक असा दिवस जो भावा-बहिणींसाठी अर्पण करण्यात आला आहे. याच खास दिवसानिमित्त आम्ही तुम्हाला सिब्लिंग डेबाबत काही खास गोष्टी सांगणार आहोत, ज्यांबाबत जाणून तुम्हीही हैराणच व्हाल. आम्ही हे स्वतःच्या मनाने सांगणार नाही तर या गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या आहेत. जाणून घेऊया खास गोष्टींबाबत...
1. छोट्या भावंडांच्या तुलनेत मोठी भावंडं जास्त स्मार्ट असतात का? मागील काही वर्षांमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, मोठ्या भावंडांचा आयक्यू छोट्या भावंडांच्या तुलनेत जास्त असतो. आता यामागील खरं कारण काय आहे, हे तर माहित नाही. परंतु असं मानलं जातं की, मोठी भावंडं आपल्या छोट्या भावंडांसाठी एक उत्तम रोल मॉडल बनण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच यांचा सेन्स ऑफ ह्यूमर वाढतो.
2. साधारणतः आई-वडिलांचं एक आवडतं मुल असं. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की, एक नावडतं आणि एका आवडतं. कोणातरी एका मुलांवर आई-वडिलांचा जास्त जीव असतोच. मग तो मोठा भाऊ किंवा लहान भाऊ असू शकतो.
3. नेदरलॅन्ड्समधील Leiden University द्वारे करण्यात आलेल्या संशोधनामधून सिद्ध झाल्यानुसार, छोटे सिब्लिंग जास्त अट्रॅक्टिव्ह असतात. त्यांच्या मनात जे असतं ते स्पष्ट बोलून टाकतात. कोणतीही गोष्ट थेट आणि स्पष्ट बोलणं त्यांना आवडतं.
4. जर तुम्हाला मोठी बहिण असेल तर तुमच्याही एक गोष्ट लक्षात आली असेल. जेव्हाही तुम्ही एखाद्या टेन्शनमध्ये असता. त्यावेळी ती तिची सर्व कामं सोडून तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करते. अनेकदा तर ती आई-वडिलांच्या ओरडण्यापासूनही वाचवते.
5. जर आई-वडिलांमध्ये भांडण झालं असेल तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या मुलांवर होत असतो. हा परिणाम नेगेटिव्हही असू शकतो आणि पॉझिटिव्हही. जर पॅरेंट्समध्ये जास्त भांडणं होत असतील तर सिब्लिंग्सचा बॉन्ड फार मजबुत होतो. कारण अशा परिस्थितीमध्ये भावंडांना वाटतं की, फक्त तेच एकमेकांना आधार देऊ शकतात.
6. ओहियो स्टेट यूनिवर्सिटीने आपल्या एका संशोधनामधून असा दावा केला की, ज्या कपल्सना मुलं असतात. त्यांच्यामध्ये घटस्फोट होण्याची शक्यता फार कमी असते. कारण तुम्ही नातं व्यवस्थित निभावू शकता. कोणतीही समस्या व्यवस्थित हॅन्डल करू शकता.
7. भावंडांचं नातं फार सुंदर असतं. आज खरचं तुम्हालाही तुमच्या लहानपणीच्या दिवसांची आणि भावंडांसोबत घालवलेला वेळ आठवत असेल. आजही तुम्हाला लक्षात असेल की, कसे आई-वडिलांच्या ओरड्यापासून वाचण्यासाठी एकत्र येऊन प्लॅन करत असतं. वेळेनुसार भावंडांच्या नात्यामध्ये फार बदल घडून आले आहेत. बिझी लाइफ आणि आपल्याच समस्यांमध्ये व्यस्त असल्यामुळे आपण अनेक गोष्टी विसरून जातो. पण ही नाती विसरायची नसतात तर आयुष्यभरासाठी जपायची असतात.