One sided love Sign : जेव्हा दोन लोक प्रेमात असतात जेव्हा दोघेही एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी सतत वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. पण अशात हेही लक्षात घेतलं पाहिजे की, ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ घालवायचा आहे. त्या व्यक्तीलाही तुम्हाला वाटतंय तसंच वाटतं का? जर असं नसेल तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. अशी स्थिती कशी ओळखायची याचे काही संकेत आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
तुम्हीच पुढाकार घेता?
जेव्हाही बोलायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तेव्हा तुम्हीच आधी पुढाकार घेता की, समोरची व्यक्ती सुद्धा असं करते? फोनवर बोलायचं असेल किंवा मेसेज करणं असेल तुम्हीच पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही वेळीच याचा विचार करायला हवा. असं का होतंय याचं कारण शोधायला पाहिजे.
तुम्ही प्रायोरिटी नाही
कधी असं झालंय का की, समोरची व्यक्ती नेहमी त्याच्या किंवा तिच्या सवडीने भेटते. तसेच आधीच तुमचं भेटण्याचं प्लॅनिंग झालं असेल आणि तरी सुद्धा तुमचा/तुमची पार्टनर मित्रांसोबत पार्टीला गेलाय. वेळेवर प्लॅन बदलला असेल तर तेही तुम्हाला न कळवणे. या सर्व गोष्टींवरून हे लक्षात येतं की, तुमचं भलेही त्या व्यक्तीवर प्रेम असेल पण त्या व्यक्तीची प्राथमिकता वेगळी आहे.
भांडणानंतर तुम्हीच सॉरी म्हणता?
प्रत्येक नात्यात काहीना काही समस्या असतातच. अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींवरून तुमच्यात भांडणही होतात. पण नेहमी चूक तुमची नसताना तुम्हीच भांडणं मिटवण्यासाठी पुढाकार घेता का? पार्टनरची चूक असूनही माफी तुम्हीच मागता आणि समोरची व्यक्ती याकडे दुर्लक्ष करते? असं होत असेल तर चित्र स्पष्ट आहे.
प्रेमाबाबत शंका ?
वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या अडचणी दिसत असतील आणि तो किंवा ती तुमच्यावर प्रेम करते की नाही? असा प्रश्न पडत असेल, तसेच तुमचा पार्टनर त्याच्या किंवा तिच्या भावना कधीच व्यक्त करत नसेल तर हे नातं एकतर्फी आहे हे समजून घ्या.