रिलेशनशिपमध्ये असण्याचा अनुभव खूप सुखावणारा असतो. पण प्रेमात भांडणं सुद्धा होत असतात. अनेकदा भांडणं टोकाला जातात. काही कपल्सना एकमेकांचा चेहरा पाहायला सुद्धा आवडत नाही. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आपला निर्णय चुकला असं अनेकांना वाटतं. परंतू वेळ निघून गेलेली असते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून तुम्ही आपला पार्टनर नक्की कसा आहे. याबाबत कळेल.
वेगवेगळ्या इमोशन्स
रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती असतात. दोघांचेही इमोशन्स एकसमान असतील असं नाही. तरी सुद्धा विचारांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. जर तुमचा पार्टनर तुमचा रिस्पेक्ट करत नसेल तर तुमच्यासाठी तो योग्य नाही. कारण पार्टनरला मेंटली आणि इमोशनली सपोर्ट करणं प्रत्येकाची जबाबदारी असते.
पर्सनल स्पेस
प्रत्येक नात्यात पर्सनल स्पेस देणं गरजेचं असतं.ऑफिसची महत्वाची मिटींग असेल किंवा मित्रांना वेळ देणं असेल त्यावेळी पार्टनरने पर्सनल स्पेस द्यायला हवी. प्रत्येक गोष्टीत रोख, ठोक करणं, सतत प्रश्न विचारणं, तुमचा मोबाईल चेक करणं असे प्रकार तुमचा पार्टनर तुमच्यासोबत करत असेल तर वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे पार्टनर हा नात्यात स्पेस देणारा असावा.
तुम्ही बदलावं असं वाटत असेल
रिलेशनशिपमध्ये असताना काही कपल्सना आपले पार्टनर जसे आहेत तसे आवडत नसतात. नेहमी अपडेट आणि आपल्याला हवं तसं पार्टनरने रहायला हवं असं काहीजणांना वाटत असतं. तुम्हाला सुद्धा पार्टनर सतत बदलण्याचा प्रयत्न करत असेल हे रिलेशन तुमच्यासाठी योग्य नाही. तुम्ही जसे आहात तसं स्वीकारणारा पार्टनर असावा
तुमच्या भावना समजून घेत नसेल
कोणतीही लहान मोठी गोष्ट असेल तर याबद्दल पार्टनरला काही कळत नसेल तर तुम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. नातं टिकवायचं असेल तर एकमेकांना समजून घेणं आवश्यक असतं. आपल्या पार्टनरने आपल्याला वेळ द्यायला हवा, असं सगळ्यांनाच वाटत असंत. पण जेव्हा तुम्ही या गोष्टी करण्यात कमी पडत असता. तसंच गर्लफ्रेडबद्दल इतरांशी बोलण्यासाठी विचार करता, तिच्यापासून दूर राहता आणि जेव्हा इंटरेस्ट कमी होतो तेव्हा इतर मुलींकडे लक्ष देता. या गोष्टी मुलींना जराही आवडत नसतात.
तुमचं मत विचारात घेतलं जात नाही
प्रेमात कोणताही निर्णय एकाच व्यक्तीच्या विचाराने घेतला जात नाही. दोघांचं मत विचारात घेणं गरजेचं असतं. अश्यात जर तुमचा पार्टनर मत विचारात घेत नसेल किंवा कोणतीही कल्पना न देता एखादी गोष्ट ठरवत असेल तर तुम्हाला हीच गोष्ट महागात पडू शकते. त्यामुळे आधीच योग्य निर्णय घ्या.