मुलांना समजून घेणं आणि त्यांना समजावणं म्हणजे फार कठिण काम. त्यांच्या मनात कधी काय येईल आणि कधी ते कोणत्या गोष्टीचा हट्ट धरतील याचा काही नेम नाही. तुमचीही मुलं छोट्या छोट्या गोष्टींवर रागावतात, हट्ट करतात, जेवणापासून दूर पळतात किंवा मग कपड्यांबाबत फार चूझी आहेत का? मग समजून जा की, तुमचं मुल अतिसंवेदनशील आहे. ही तर फार सुरुवातीची लक्षणं आहेत. परंतु, मुलं जशी मोठी होत जातात. त्यांच्या वागण्या बोलण्यात अनेक बदल घडून येतात. अशा मुलांचं वागणं-बोलणं काही इतर लक्षणांवरूनही लक्षात घेता येतं. जाणून घेऊया अशा काही लक्षणांबाबत...
- मुलं प्रत्येक वेळी खाण्यासाठी नवनवीन पदार्थांची मागणी करत असतात. अशातच त्यांना तुम्ही एखादा पदार्थ खाण्यासाठी दिला तर तो पदार्थ खाण्यासाठी ते नकार देऊन टाकतात. अनेकदा तर एकच पदार्थ खाण्यासाठी सतत मागत राहतात. सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री त्यांनी फक्त तोच पदार्थ खायला आवडतं.
- इतर मुलांच्या तुलनेत तुमचं मुल लगेच थकतं का? मुल जेव्हा बाहेर इतर मुलांसोबत खेळायला जातं. त्यावेळी दुसऱ्या मुलांसोबत खेळताना सतत धाप लागणं, घाम येणं, दमून बाजूला जाऊन बसतात.
- ज्यावेळी तुम्ही त्यांना रात्री झोपवत असता, त्यावेळी त्यांना बराच वेळ झोप न येणं आणि सकाळी उठल्यानंतर रात्री पडलेल्या वाईट स्वप्नांबाबत तक्रार करणं.
- एखाद्या मित्राने किंवा वडिलधाऱ्या माणसांनी लाडाने चिडवलं किंवा खोडी काढली तर लगेच रडण्यास सुरुवात करणं. सारखेच वय असणाऱ्या इतर मुलांच्या तुलनेत जास्त रडणं आणि एखाद्यावेळी रडण्यास सुरुवात केली तर अजिबात शांत न होणं.
- शाळेत जाण्याऐवजी वेगवेगळी कारणं सांगून टाळाटाळ करणं. तुम्ही जबरदस्तीने शाळेत पाठवण्याचा प्रयत्न केला तर सतत रडणं, ओरडणं. इतकं केल्यानंतर शाळेत गेलचं तर शाळा सुटल्यानंतर तिथून परत न येणं.
- एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर त्यांचं मन न रमणं. घरामध्ये होणाऱ्या कोणत्याही छोट्या मोठ्या बदलांचा स्विकार फार उशीराने करणं.
जर वरील सर्व लक्षणांपैकी कोणत्याही प्रकारची लक्षणं तुमच्या मुलांमध्ये दिसली तर समजून जा की, तुमचं मुल 'अंतमुर्खी' समजलं जातं. म्हणजेच अशी मुलं लवकर कुठेही मिसळून जात नाहीत. त्यांना एकटं राहायला आवडतं. ते फार कोणाशी बोलतही नाहीत.
अतिसंवेदनशील मुलं अनेकांना पाहताना फार विचित्र वाटतात. परंतु अशी मुलं रचनात्नक, संवेदनशील, कल्पनाशील आणि बुद्धिमान असतात. यामागील कारणं अनुवंशिक असू शकतं. आई किंवा वडिल दोघांपैकी कोणामध्येही लहान असताना ही लक्षणं आढळून आली असतील तर त्यांच्या मुलांमध्येही हीच लक्षणं दिसून येतात.
तुमचं मुल अतिसंवेदनशील असेल तर त्याचं संगोपन करताना विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. रात्री उशीराने झोपणं किंवा जेवण व्यवस्थित न करणं. यांमुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुलांनी रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. त्यांच्या झोपण्याचं, खेळण्याचं, अभ्यासाचं एक रूटिन तयार करा.
मोकळीक द्या
अति संवेदनशील मुलं बऱ्याचदा सोशल फोबियाची शिकार होतात. त्यामुळे त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा. दुसऱ्या मुलांसोबत वेळ घालवल्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये परिवर्तन येऊ शकतं. त्यांना नवीन लोकांसोबत ओळखी करू द्या. त्यांना घराबाहेर घेवून जात असाल तर त्यासाठी त्यांना मानसिकरित्या तयार करा.
वेळ द्या
अनेकदा कामाच्या धावपळीमुळे मुलांकडे लक्ष देणं शक्य होत नाही. अशावेळी तुमच्या धावपळीमधून थोडा वेळ काढून मुलांसोबत बोला. त्यांना काय हवं नको ते बघा. त्यांचं कौतुक करा. समजून घ्या
अति संवेदनशील मुलांना दुसऱ्या मुलांच्या तुलनेत मिसळण्यास वेळ लागतो. त्यांना स्वतःचा वेळ द्या. शाळेतून आल्यानंतर त्यांना फार ट्यूशन्स, हॉबीज किंवा इतर गोष्टींमध्ये गुंतवून ठेवू नका. मुलांना मुलं म्हणूनच समजून घ्या. त्यांना दुसऱ्या इतर गोष्टींद्वारे एकटेपणातून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करा.