(image credit-kroc.com)
प्रत्येक मुलगा किंवा मुलगी एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये येतात. तेव्हा खुप इंन्टरेस्टिंग वाटत असतं. सुरूवातीच्या काळात एकमेकांना फारसं ओळखत नसल्यामुळे पार्टनरच्या बोलण्याच्या, विनोदी स्वभावाच्या सगळ्यात गोष्टी चांगल्या वाटत असतात पण काही काळानंतर आपल्याला त्याच व्यक्तीचा राग यायला सुरूवात होते. कारण अनेकदा त्या व्यक्तीला इग्नोर सुद्धा करत असतो.
एका रिसर्चमध्ये हे स्पष्ट झाले आहे की अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असलेले कपल्स सगळ्यांच्या समोर चांगले वागत असतात. पण त्यांच्य नात्यात दुरावा यायला सुरूवात झालेली असते. पण नेमकं काय बिनसलय आणि काय हे चुकतय .हे अनेकदा कपल्सना कळत नाही. त्यामुळे नातं तुटत असतं. आज आम्ही तुम्हाला रिलेशनशीपच्या बाबतीत काही टिप्स देणार आहोत. त्यामुळे जर तुमच्या नात्यात दुरावा आला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल आणि तुम्ही स्वतःच्या पार्टनरला गमावण्यापासून वाचवू शकता.
इतर व्यक्तींशी गोष्टी शेअर करता
रिलेशनशीमध्ये असताना पार्टनरशी गोष्टी शेअर करणं हे खूप नॉर्मल आहे. कारण जर तुम्ही आपल्या रोजच्या लाईफमध्ये जगत असताना ज्या गोष्टी पार्टनरशी शेअर करण्यासाठी ऑकवर्ड फिल करत असाल किंवा त्याच गोष्टी पार्टनरला न सांगता इतर मित्रांना सांगत असाल तर तुमच्या नात्यात दुरावा येण्याचे हे लक्षण असु शकतं.
वेळ न देणे
(image credit-www.india.com)
कोणतेही कपल्स एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी उत्सूक असतात. दोघांना वेळ मिळाल्यानंतर आपल्या वेळेनुसार एकमेकांना भेटायचा प्रयत्न करत असतात. पण जर तुम्ही पार्टनरच्या सुट्टीच्या दिवसाचा विचार न करता स्वतःच्या विकऑफच्या दिवशी पार्टनरला भेटायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही भावनीकदृष्या आपल्या पार्टनरपासून लांब जात आहात.
सोबत राहण्याचा विचार न करणे
जर तुम्ही आपल्या पार्टनरला कंटाळून सोबत राहू शकणार नाही असा विचार करत असाल तर तुमचं नातं कधीही तुटण्याची शक्यता असते .किंवा एकमेकांसोबत राहण्याबद्दल तुमच्या मनात शंका येत असेल तर तुम्ही आपल्या पार्टनरशी ब्रेकअप कधीही करू शकता असे संकेत दिसू लागतात. ( हे पण वाचा-प्रेमात धोका देऊ शकतात 'या' राशीच्या मुली, जाणून घ्या...)
फिजीकल टचचा अभाव
लग्न झालेले लोकं असूदे किंवा रिलेशनशीपमध्ये असलेले लोकं असू दे नेहमीच एकमेकांचा हात हातात घेऊन गप्पा मारणे, मिठी मारून प्रेम व्यक्त करणे अशा भावना फिजीकल टच करून व्यक्त केल्या जातात पण जर तुमच्या रिलेशनशीपमध्ये स्पर्शाचा अभाव असेल तर तुम्हाला एकटेपणा किंवा अनसेफ वाटू शकतं. त्यामुळे नकळतपणे तुम्ही तुमच्या पार्टनर पासून लांब जाऊ लागता.
बोलण्यासाठी विषय न सुचणे
जर तुम्हाला पार्टनरशी बोलताना कोणताच महत्वाचा मुद्दा सुचत नसेल. किंवा सारख 'तु बोल , तु बोलना' असं बोलावं लागत असेल तर समजा तुमचं रिलेशनशीप खूपच बोअर होत चाललं आहे. तुमच्या आयुष्याबद्दल बोलण्यासाठी खास टॉपिक नसतील तर तुमच्याकडे भावनीकदृष्या बोलण्यासाठी काहीही उरलेलं नाही. (हे पण वाचा-गर्लफ्रेन्डला खूश करण्याचा वैज्ञानिक फंडा कधीच कमी होणार नाही तिच्यातील रोमान्स...)