...म्हणून मिळतो चांगल्या मुलांंना धोका !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 7:56 AM
नाते तर विश्वासावर टिकलेले असते, मात्र या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत ज्यामुळे नात्यात धोका मिळत असतो. आज आम्ही आपणास याच कारणांबाबत माहिती देत आहोत, ज्यामुळे चांगल्या मुलांना प्रेमात धोका मिळतो.
बऱ्याचदा असे दिसून येते की, जे मुले मुलींसोबत नेहमी फ्लर्ट करतात, त्यांना चांगला लाइफ पार्टनर मिळतो आणि जे मुले प्रामाणिक असतात त्यांना नेहमी प्रेमात धोका मिळतो. अशावेळी लोकांचा प्रेमावरचा विश्वास उठतो. नाते तर विश्वासावर टिकलेले असते, मात्र या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत ज्यामुळे नात्यात धोका मिळत असतो. आज आम्ही आपणास याच कारणांबाबत माहिती देत आहोत, ज्यामुळे चांगल्या मुलांना प्रेमात धोका मिळतो. * विशेषत: चांगली मुले आपल्या एक्स-पार्टनरबद्दल आपल्या गर्लफ्रेंडला सांगून देतात. अशावेळी मुलीच्या मनात संशय निर्माण होतो की, याने अगोदरच्या गर्लफे्रंडला सोडले आहे तर मलाही एक दिवस सोडू शकतो. * बऱ्याच मुलींना आपल्या आयुष्यात कुणाचा हस्तक्षेप अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या चुकांवर चांगल्या मुलांकडून देण्यात आलेला सल्ला त्यांना नकोसा वाटतो. म्हणून नात्यात दूरावा निर्माण होतो. * बऱ्याचदा चांगल्या मुलांना आपणच बरोबर आहोत, असे वाटते. नेमकी हिच गोष्ट मुलींना आवडत नाही. शिवाय चांगले मुले नेहमी आपल्या गर्लफे्रंडवर बंधने लादतात, ज्यामुळे मुली त्यांना लाइक करत नाही आणि मुली त्याच्यापासून लांब जातात. * आपल्या पार्टनरची काळजी घेणे चांगली गोष्ट आहे. मात्र काही मुलींना जास्त काळजी घेणे आवडत नाही. कुणी आपली जास्त काळजी घेणे, म्हणजे पारतंत्र्यात जगणे असे त्यांना वाटते. त्यामुळे त्या अशा नात्यापासून चार हात लांब पडण्याचा मार्ग शोधतात. * चांगली मुले प्रामाणिक असल्याने त्यांच्याकडे इनकम सोर्सदेखील कमी असतो. त्यांची मिळकत कमी असल्याने मुलींना ते आवडत नाही. त्यामुळे मुलींना असा पाटर्नर नको असतो. * नात्याला दिर्घकाळ टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपल्या पार्टनरची आवड-नावड काय आहे, याचा पूर्ण अभ्यास हवा.