चार मुलांचा सांभाळ करणारी सुपरमॉम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2016 2:04 PM
एकाचवेळी चार लहान बाळांना सांभाळण्याची जबाबदारी आली तर
हल्ली एका मुलाचा सांभाळ करण म्हणजे दमछाक आणणारी गोष्ट. ही गोष्ट एखादी आई चांगली सांगू शकेल. मात्र विचार करा एकाचवेळी चार लहान बाळांना सांभाळण्याची जबाबदारी आली तर. कसे जमेल असा विचार तुमच्या मनात आला असेल. मात्र कॅनडाच्या सुपरमॉमने हे करून दाखवले आहे. कॅनडाच्या डॅन गिब्सनने दोन मिनिटांचा व्हिडीओ शेअर केलाय. यात चार मस्तीखोर बाळांना कपडे घालताना तिची कशी दमछाक होतेय हे दाखवलेय. गेल्या सहा दिवसांत सहा कोटाहून अधिकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.तिला मागील वर्षी चार मुले झाली होती. तेव्हा तेव्हा या आईने आपण अतिशय भाग्यवान आहोत असे सांगितले होते. आता या मुलांचा सांभाळ करणे कठीण बाब असल्याचेही ती म्हणाली होती. मात्र आता या मुले मोठी झाली असून चांगलीच मस्तीखोर झाली आहे. यामुळे तिला त्यांचा सांभाळ करणे थोडे कठीण वाटत असले तरी त्यांचा चांगला सांभाळ करताना दिसते.">http://