(Image Credit : 1to1 Therapy Services)
आज शिक्षक दिन... शिक्षक म्हणजे आपले गुरू, आपल्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती जी आपल्याला ज्ञान देते. अनेक गोष्टी शिकवते. खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचा पायाच रचते. पण आपल्या आयुष्यातील सर्वात पहिली शिक्षका असते ती म्हणजे आपली आई.
आपण अनेकदा असं ऐकलं आहे की, 'देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने आपली काळजी घेण्यासाठी आईला पाठवलं.' त्यामुळेच आपण आईला देवाची उपमा देतो. आई फक्त आपल्याला जन्म नाही देत तर आपल्या न्हाऊ-माखू घालते, आपल्यावर संस्कार करते. आपल्या आयुष्याचा पाया खऱ्या अर्थाने आई रचते. अशातच या गोष्टीमध्ये काही शंका नाही की, आपली आईच आपली बेस्ट टिचर असते.
(Image Credit : EverydayFamily)
न सांगताही आईला समजतात सगळ्या गोष्टी
मुलाला आईपेक्षा जास्त कोणीही समजू शकत नाही. तसेच मुलाने न सांगताच आईला त्याच्या सर्व गोष्टी समजतात. त्याला काय हवं, काय नको या सर्व गोष्टी त्याला समजण्यास मदत होते. जेव्हा बाळ जन्म घेतं त्यावेळी त्याला काही समजत नसतं. त्यावेळी त्याच्या गरजा ओळखून त्याला आईचं सांभाळते.
(Image Credit : lextalk.com)
आपल्या मुलांना व्यवहारिक ज्ञानही देते आई
आपलं मुलाने वाईट गुण आत्मसात करावे असं कोणत्याच आईला वाटत नाही. त्यामुळे आपल्या मुलावर चांगले संस्कार करण्यासाठी ती सतत झटत असते. बाळ जन्मल्यानंतर त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती त्याला चांगल्या गोष्टी शिकवत असते. तसेच त्याच्यासाठी कोणतही गोष्ट वाईट आणि कोणती गोष्ट चांगली या गोष्टी ती सतत त्याला समजावून सांगत असते.
(Image Credit : Twenty-Seven.Co.U)
आई सांगत असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्षं करू नका
आई प्रत्येकाच्याच आयुष्यातील बेस्ट आणि पहिली टिचर असते. अशातच आईच्या प्रति प्रत्येक मुलाची जबाबदारी असते की, त्याने आईची प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि तिची काळजी घेतली पाहिजे.