टेडी बिअर हा सगळ्यांनाच आवडत असतो. अनेकजण आपल्या पार्टनरचा राग घालवण्यासाठी टेडी बिअर देत असतात. कारण गोड, गोंडस टेडी बिअर पाहून सगळ्यांनाच आनंद होत असतो. आज व्हेलेनटाईन वीकचा चौथा दिवस म्हणजेच टेडी डे. जर तुम्ही आपल्या पार्टनरला टेडी देण्याचा विचार करत असाल तर डेडी बिअरची संकल्पना कुठून आली हे नक्की माहित करून घ्या.
असा तयार झाला जगातला पहिला टेडी
अमेरिकेचे 26वे राष्ट्राध्यक्ष थेडॉर रुजवेल्ट मिसीसिपीच्या जंगलात गेले होते. तेव्हा तिथे त्यांना एका झाडाला अस्वलाला बांधून ठेवल्याचं दिसलं. अस्वल जखमी झालं होतं. रुजवेल्ट यांनी या अस्वलाला मुक्त केलं. त्यानंतर या घटनेची चर्चा संपूर्ण अमेरिकेत झाली. अमेरिकेतील त्यावेळच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्रात कार्टुनिस्ट बेरीमेन यांनी ही घटना रेखाटणारं कार्टुन काढलं होतं, त्यातील कार्टुन अस्वल लोकांना खूपच आवडलं. या अस्वलाच्या कार्टुनने प्रभावित होऊन अमेरिकेतील टॉयमेकर मॉरिस मिचटॉम यांनी खेळणं म्हणून कापडी अस्वल तयार केलं आणि त्याला टेडी बिअर असं नाव दिलं. टेडी हे रूजवेल्ट यांचं टोपणनाव होतं, त्यामुळे खेळण्यातील या अस्वलाला टेडी बिअर असं नाव देण्यात आलं. ( हे पण वाचा-प्रपोज करताना 'या' गोष्टी माहीत नसतील तर मिळू शकतो नकार!)
रूजवेल्ट यांनी अधिकृतरित्या या खेळण्याला टेडी बिअर असं नाव देण्यास मंजुरी दिल्यानंतर हे खेळणं बाजारात आलं. 1903 साली पहिला टेडी बिअर विक्रीसाठी ठेवण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत या टेडी बिअरची क्रेझ अजूनही आहे. त्यानंतर सगळेच आपल्या प्रिय व्यक्तीनां डेडी बिअर देऊ लागले. डेडी बिअर दिसायला खूपच आकर्षक असतात. लहान मुलांचचं नाही तर मोठ्यांच सुद्धा लक्ष वेधून घेत असतात. ( हे पण वाचा-'या' तीन राशींचे पार्टनर आपल्या भावना ठेवतात लपवून!)