शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

‘वेटिंग रूम’मध्ये जळणाऱ्या तारुण्याची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 8:48 AM

मुळातच पौगंडावस्थेतून तारुण्यात प्रवेश करण्याचं वय अतिशय संवेदनशील आणि नाजूक असतं. वयाच्या या टप्प्यावर मुला - मुलींना मोठ्यांचा आधार, मार्गदर्शन हवं असतं आणि नेमक्या याच काळात युक्रेनमधील तरुणांना युध्दामुळे नाइलाजास्तव आपला देश सोडावा लागला.

तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांचं आयुष्य काय असतं? शिकणं, मित्र - मैत्रिणींसोबत मजा करणं, प्रेमात पडणं, नवनवीन गोष्टींचा अनुभव घेणं, हेच तर या वयातली मुलं करत असतात. दोन वर्षांपूर्वी १७ वर्षांच्या मरहार्यटा चिकालोव्हा हिचं आयुष्य सुखाचं होतं. ती आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत भविष्याचं स्वप्न रंगवत होती. पण, तिचं आणि तिच्यासारख्या हजारो मुलामुलींचं जग, त्यांची स्वप्नं सगळंच उद्ध्वस्त झालं. 

युक्रेनमधील शहराशहरांवर रशियाचे बाॅम्ब पडू लागले आणि येथील उमलू लागलेल्या तरुण मुलांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. जगण्यासाठी युक्रेनमधील हजारो मुलांनी पालकांसोबत तर कोणी एकट्यानेच आपलं घर, आपलं गाव - शहर, आपला देश सोडला.  आज युक्रेनमधील हजारो मुलांनी पोलंडमध्ये आश्रय घेतला आहे. १३ ते १८ या वयोगटातील १,६५,००० युक्रेनियन तरुणांची पोलंडमध्ये विस्थापित म्हणून नोंद आहे.  दुसऱ्या देशात जाऊन जगण्याचा, ओळखीचा आणि अस्तित्त्वाचा संघर्ष काय असतो, हे सध्याच्या घडीला युरोपमधल्या वेगवेगळ्या देशात विस्थापित झालेल्या युक्रेनियन तरुण - तरुणींनाच सांगता येईल. 

मुळातच पौगंडावस्थेतून तारुण्यात प्रवेश करण्याचं वय अतिशय संवेदनशील आणि नाजूक असतं. वयाच्या या टप्प्यावर मुला - मुलींना मोठ्यांचा आधार, मार्गदर्शन हवं असतं आणि नेमक्या याच काळात युक्रेनमधील तरुणांना युध्दामुळे नाइलाजास्तव आपला देश सोडावा लागला. मरहार्यटा ही दक्षिण युक्रेनमधील खेर्सन या शहरात राहात होती. रशियाने जेव्हा शहरावर आक्रमण केलं तेव्हा स्वत:चा जीव वाचवण्यासाठी  तिने आपल्या आईसोबत घराच्या तळघरात दोन आठवडे काढले. संधी मिळताच तिने आणि आईने घर सोडलं. दोघींनी आधी मोल्डोवा गाठलं. तिथून त्या दोघी रोमानियाला गेल्या आणि नंतर पोलंडमधील ग्डिनिया शहरात आल्या. या शहरात काही दिवस काढल्यानंतर पोलिश शाळेत प्रवेश घेतला. पण, सुरुवातीचे सहा महिने तिच्यासाठी फारच जड गेले. मग तिने पोलिश भाषा शिकायला सुरुवात केली. यादरम्यान युक्रेनमधल्या तिच्या जुन्या मित्र -मैत्रिणींशी तिचा फोनवरून संपर्क होत होता. पण, मरहार्यटाला फारच एकटं वाटत होतं. तिला सतत आपल्या घराची आठवण येत होती. पण, डिसेंबर २०२२मध्ये रशियाने टाकलेल्या बाॅम्बमध्ये तिचं घर उद्ध्वस्त झालं. त्या घराचे फोटो जेव्हा तिने आपल्या मोबाइलवर पाहिले तेव्हा आता सगळं संपलं, घर गेलं, काहीच शिल्लक राहिलं नाही, या भावनेने मरहार्यटाला नैराश्य आलं. त्यावर मात करण्यासाठी मग तिने नाटकाचा सराव करायला सुरुवात केली.

जी स्थिती मरहार्यटाची तीच पोलंडमध्ये राहात असलेल्या इतर युक्रेनियन तरुण - तरुणींची होती.  सुरुवातीच्या काळात युक्रेनियन तरुणांचा पोलंडमधील तरुणांशी संघर्ष होत होता. पण, मग युध्दाने केलेल्या आघातातून बाहेर येण्यासाठी अनेक मुलांनी खेळामध्ये भाग घेतला. युध्दाच्या विचारातून बाहेर येऊन आपल्या भविष्यावर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी ते खेळ शिकू लागले.

ॲण्ड्रिल नोनका हा १५ वर्षांचा मुलगा. तो ६ मार्च २०२२ला पोलंडला जगण्यासाठी आला. त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. त्याचे वडील अजूनही युक्रेनमधेच आहेत. त्याला युक्रेनला जाऊन आपल्या वडिलांना, मित्रांना भेटण्याची तीव्र इच्छा आहे. इथे बाॅक्सिंग क्लबमुळे नवीन मित्र शोधायला मदत झाली. त्याला आता पोलंडमध्ये आपलं भविष्य दिसू लागलं आहे.  १७  वर्षांची डारिया व्यनोर्हडोव्हाला मात्र आता रशियाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या खार्किव्हमध्ये आपलं काहीच भविष्य दिसत नाही. त्यामुळे आता युक्रेनमध्ये न परतता पोलंडमध्येच आपलं भविष्य घडवणार असल्याचं तिने ठरवलं आहे.  दोन वर्षांनंतर पोलंडमध्ये आलेल्या युक्रेनच्या तरुणांना किमान आता आपलं भविष्य दिसू लागलं आहे. त्यात पोलंडमधील ‘ब्ल्यू ट्रेनर्स’ या शाॅपिंग माॅलमधील सामुदायिक जागेचा वाटा मोठा आहे. येथे एकत्र जमून बोर्ड गेम खेळणं, एकमेकांशी संवाद साधणं, मानसिक समस्यांवर तज्ज्ञांशी चर्चा करता येणं यासारखे भरपूर उपक्रम युक्रेनियन मुलांच्या मनाला उभारी देत आहेत.  येथे येऊन युक्रेनमधील विस्थापित मुलांच्या डोक्यावरचं युध्दाचं ओझं थोडं का होईना हलकं होतं आहे.

अत्यंत दमवणारा प्रवासपोलंडमधील मानसशास्त्रज्ञांच्या मते, हजारो युक्रेनियन मुलं कधीतरी युध्द थांबेल, आपण आपल्या देशात, आपल्या घरी राहायला जाऊ या मानसिकतेत जगताहेत. या अवस्थेला मानसशास्त्रीय भाषेत ‘वेटिंग रुम सिंड्रोम’ असं म्हणतात. या अवस्थेतील हजारो युक्रेनियन मुलं मनाने आपल्या मायदेशाला घट्ट चिकटून बसलेली आहेत. या अवस्थेत जगणाऱ्या मुलांची मानसिक आणि भावनिक अवस्था भीषण आहे. या अवस्थेत जगणं आणि दुसऱ्या देशात राहून आपल्या भविष्याला आकार देण्याची कसरत करणं, या प्रवासात ही मुलं खूप दमत आहेत.