हे सर्वांनाच माहीत असेल की, कोणतीही व्यक्तीही परिपूर्ण नसते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीना काही कमतरता असतेच. अशाच काही तुमच्या पार्टनरमध्येही सवयी असतीलच ज्यांचा तुम्हाला त्रास होत असेल. जसे की, वेळेचं भान नसणे, महत्त्वाच्या तारखा विसरणे, स्वच्छता न ठेवणे यांसारख्या वाईट सवयी असू शकतात. या सवयी भविष्यात बदलल्या जाऊ शकतात, पण काही अशा सवयी असतात ज्या आपण बदलू शकत नाहीत. या न बदलता येणाऱ्या सवयींमुळे नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊ अशा काही सवयी ज्या बदलता येणं कठिण आहे.
उदास असल्यावर दुर्लक्ष करणे
तुमचा पार्टनर त्यावेळी तुमच्याकडे दुर्लक्ष करतो जेव्हा अडचणीत असता किंवा काही कारणाने उदास असता. तो तुमच्यासाठी भावनात्मक रूपाने उपलब्ध नसतो. असं झाल्याने नात्यात नाराजीचा सूर येतो. अशावेळी दोघांनीही मोकळेपणाने या विषयावर बोलायला हवे.
नेहमी आपल्या बोलण्यावर अडून राहणे
नेहमी आपल्या म्हणण्यावर अडून राहणे अशी सवय काही लोकांना असते. यानेही नातं विस्कटतं. तुमचा पार्टनर जर असाच अडून बसणारा असेल तर नात्यात नेहमी खटके उडतात. या कारणाने आत्मविश्वासावर नकारात्मक प्रभाव पडतो. अशाप्रकारचं वागणं एका काळानंतर फार नुकसानकारक ठरतं.
खोटं बोलणे
कोणतीही व्यक्ती अशा व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही जी नेहमी खोटं बोलते. हे सांगण्याची अजिबात गरज नाहीये की, कोणतंही नातं हे विश्वासावर टिकलेलं असतं. जर तुमचा पार्टनर सतत खोटं बोलत असेल आणि त्याची सवय त्याच्या लक्षात येत नसेल तर नातं चुकीच्या मार्गावर जात आहे.
नात्यांकडे दुर्लक्ष करणं
सामान्यपणे रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांमध्ये भांडणं होत असतात. पण विनाकारण भांडणं करून त्रासाशिवाय काहीही मिळत नाही. पण जर तुमचा पार्टनर नात्यासंबंधी मुद्द्यांकडे नेहमी दुर्लक्ष करत असेल तर कठीण आहे. त्याला जर काही पडलेलीच नाही, असं तो वागत असेल तर त्याची ही सवय मोडू शकत नाही.
अधिक फ्लर्ट करणे
कुणासोबत गंमत करण्यात आणि फ्लर्ट करण्यात फार सूक्ष्म अंतर असतं. त्यामुळे नात्यात या गोष्टीवर चर्चा व्हायला हवी की, तुमचा पार्टनर कुणासोबत फ्लर्ट करत असेल तर त्याला एक सीमा असावी. पण त्याला याची सवयही असू शकते.
काळजी न घेणे
प्रत्येकालाच वाटत असतं की, पार्टनरने आपली काळजी घ्यावी. जसे की, विचारपूस करणे, दिवसातून किमान एकदा फोनवर बोलणे, त्रासात असाल तर आधार देणे, शारीरिक-मानसिक आधार देणे. त्यासोबतच जर तुमच्या पर्सनल स्पेसची काळजी घेणे हेही यात येतं. पण काही लोकांना निष्काळजी असण्याची सवय असते. त्यांना कशाचं काही देणंघेणं नसतं.
अपमान करणे
जर तुमचा पार्टनर तुम्हाला शारीरिक किंवा भावनात्मक रूपाने टॉर्चर करत असेल समजून घ्या की, याप्रकारची सवय बदलणे शक्य नाही. तुमचं त्या व्यक्तीवर कितीही प्रेम असू द्या, पण समोरच्या व्यक्तीच्या सवयींमुळे नातं अडचणीत येतं.