(Image Credit : Elliot Scott Coaching)
अनेक गोष्टी अशा असतात ज्यामुळे तुमचं व्यक्तीमत्व प्रभावी होतं आणि काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे तुमच्या व्यक्तीमत्त्वावर वाईट प्रभाव पडतो. काय तुम्ही कधी विचार केलाय का की, काही लोक तुम्हाला फार पसंत करतात आणि काही लोकं तुमच्यापासून दूर पळतात? एखाद्याबाबत आकर्षण असणं किंवा नसणं हे पूर्णपणे व्यक्तीमत्त्वावर अवलंबून असतं.
जर तुम्हालाही वाटत असेल की, तुमच्यापासून काही लोक दूर पळतात आणि बोलणेही टाळतात तर हे तुमच्या व्यक्तीमत्त्वामुळे असू शकतं. खालील काही कारणांमुळे लोक तुमच्यापासून दूर पळत असावे.
तणाव -
अनेक शोधांमधून हे सिद्ध झालं आहे की, ज्या लोकांना हाय लेव्हल कॉर्टिसॉल असतं, ते कमी आकर्षक असतात. असे लोक नेहमीच तणावात असतात, ज्यामुळे दुसरे लोक अशांपासून अंतर ठेवणेच पसंत करतात.
दगाबाज -
जर तुम्ही खोटं बोलत असाल तर तुम्ही कधीही इतरांना पसंत पडणार नाहीत. तुम्हाला लोक टाळायला लागतील. अनेक सर्वेतून हे समोर आलं आहे की, जर तुम्ही खोटं बोलत असाल आणि दगा देत असाल तर तुमच्या कुणीही जवळ येणार नाही.
झोप न घेणे -
ज्या लोकांना कमी झोप येते किंवा जे लोक पुरेशी झोप घेऊ शकत नाही, ते नेहमीच चिडचिड करत असतात. अशा लोकांपासून दुसरे लोक दोन हात दूरच राहणं पसंत करतात.
कठोर -
जर तुम्ही नेहमी कठोर वागता किंवा दुसऱ्यांशी बोलताना चांगल्याप्रकारे बोलत नसाल तर लोक तुम्हाला टाळतील.
घमेंड -
अशाप्रकारच्या व्यक्तीला कुणीही पसंत करत नाहीत. हे लोक केवळ स्वत:बाबत विचार करतात. घमेंडी लोकांपासून दुसरे लोक दूर पळतात.
गंमत न समजणारे -
जर तुम्हाला कुणी केलेली गंमत समजत नसेल किंवा त्यावरुन तुम्ही चिडत असाल तर कुणीही तुमच्या नादाला लागणार नाही. दुसरे लोक तुम्हाला टाळतील.