जेव्हा दोन व्यक्ती रिलेशनशिपमध्ये येत असतात. तेव्हा तुम्हाला असं वाटत असतं की तुम्ही एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेता. दोघांचेही विचार आणि राहणीमान एकमेकांशी मिळते जुळते असतात. अनेकदा पत्रिका , ग्रह तारे सगळं व्यवस्थित असताना सुद्धा नात्यात भांडण होत असतात. कारण नसताना वादाल तोंड फुटतं. काही राशीचे पुरूष आणि महिला एकमेकांकडे आकर्षीत होत असतात. आज आम्ही तुम्हाला कोणत्या दोन राशींचे कपल्स चांगले बनू शकतं नाही याबाबत सांगणार आहोत.
मकर आणि मेष
चांगले विचार आणि उत्तम राहणीमान असलेल्या मकर राशीच्या लोकांचं मेष राशीच्या कायम उताविळपणे राहत असलेल्या लोकांसोबत जराही जमत नाही. मेष राशीच्या लोकांचा सतत ताब्यात ठेवण्याचा स्वभाव मकर राशीच्या लोकांना जराही आवडत नाही. तसंच ऑफिसचं काम असो किंवा घरचं नेहमी संथगतीने केल्यामुळे मकर राशीच्या लोकांना मकर राशीच्या लोकांचं वागणं खटकतं.
कुंभ आणि वृषभ
खूप उत्साही आणि ओपन माईंडेड असलेल्या कुंभ राशीच्या लोकांचे जिद्दी स्वभाव असलेल्या वृषभ राशीच्या लोकांशी पटत नाही. या दोन राशीचे लोक कपल्स म्हणून एकमेकांसोबत राहत असतात त्यावेळी घर चालवण्यापासून, पैसे आणि भविष्यकालीन योजनांवरून सतत खटके उडून भांडणं होतात.
मीन आणि मिथुन
काहीसा क्रियेटीव्ह आणि सहज असणारा मीन राशीच्या लोकांचा स्वभाव मिथून राशीच्या लोकांना समजण्यास त्रास होतो. मीन राशीचे लोक इतरांची इच्छा आणि भावनांचा खूप आदर करत असतात. मिथून राशीचे लोक सांगतात एक आणि करततात वेगळंच काही. त्यामुळे या दोन राशींच्या कपल्सचं एकमेकांसोबत पटत नाही.
कर्क आणि मेष
मेष राशीचे लोक जेव्हा सौम्य स्वभावाच्या राशीच्या लोकांच्या संपर्कात येतात. तेव्हा अनेक अडचणी येत असतात. कर्क राशीचे लोक काळजी घेणारे असतात. मेष राशीचे लोक बहर्मुख असतात. आणि मकर राशीचे लोक अंतर्मुख असतात.
वृषभ आणि सिंह
सिंह राशीचे लोक जिद्दी स्वभावाचे असतात. सिंह राशीचे लोक आत्मकेंद्रिंत सुद्धा असतात. सिंह राशीच्या लोकांना एकांतात रहायला आवडत असतं. याऊलट वृषभ राशीच्या लोकांना जास्त लोकांमध्ये राहायला आवडत असतं. त्यामुळे या दोघांमध्ये सतत भांडण होत असतात. (हे पण वाचा-गर्लफ्रेंड प्रेम करते की फक्त तुमचा फायदा घेतेय, कसं ओळखाल? वापरा 'ही' ट्रिक)
कर्क आणि तुळ
कर्क राशीचे लोक इमानदार आणि स्थिर आणि संवेदनशील असतात. याऊलट तुळ राशीचे लोक दिखाऊपणा करणारे असतात. त्यामुळे दोघांमध्ये सतत भांडणं होत असतात. ( हे पण वाचा-'या' ५ कारणांमुळे इच्छा नसताना सुद्धा लोक लग्न करतात)