रिलेशनशिप टिकवून ठेवण्यासाठी विश्वास महत्वाचा असतो. पण कोणत्याही गोष्टींचा अतिरेक केल्यामुळे नातं तुटू शकतं. मुलांच्या तुलनेत मुली आपल्या पार्टनची जास्त काळजी घेतात. मुली जास्त प्रेम करत असल्यामुळे अनेकदा अतिकाळजी, संशय, इंसिक्यूरिटी या भावना सुद्धा वाढीस लागतात.
एका मर्यादेपलिकडे गर्लफ्रेंडच्या अशा वागण्याचा वैताग यायला सुरूवात होते. मुली आपल्या पार्टनरबाबत लहान सहान गोष्टींवरून अलर्ट असतात. त्यामुळे संशयाची प्रवृत्ती वाढत जाते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या राशीच्या मुली जास्त संशयी असतात. याबाबत सांगणार आहोत. जेणेकरून या टिप्सचा वापर करून तुम्हाला आपलं रिलेशनशिप टिकवणं सोपं जाईल.
मेष
मेष राशीच्या मुली काही सॉफ्ट नेचर किंवा शांत स्वभावाच्या असतात. या राशीच्या मुलींना आपलं नातं इमानदारीने टिकवायचं असतं. आपल्या पार्टनरसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे त्यांना आपल्या पार्टनरला गमावण्याची जास्त भीती वाटते. म्हणून मेष राशीच्या मुली आपल्या पार्टनरवर संशय घेतात.
मकर
मकर राशीच्या मुली आपल्या पार्टनरबाबत खूपच पजेसिव्ह असतात. त्यामुळे आपल्या पार्टनवर सतत संशय घेतात. पार्टनरसाठी काहीही करण्याची तयारी असते.
कर्क
कर्क राशीच्या मुली खूप केअरिंग असतात. त्याचसोबतच इमोशनल सुद्धा असतात. पार्टनरच्या लहान लहान गोष्टींकडे त्याचं लक्ष असतं.बोलण्यावरून, फिरण्यावरून प्रत्येक गोष्टीत संशय घेतल्यामुळे नात्यात दुरावा येतो.
धनु
धनु राशीच्या मुली कर्क राशीच्या मुलीं स्वभावानेच संशयी असतात. असं सांगितलं जातं की, त्या नेहमी आपल्या पार्टनरवर लक्ष ठेवतात. (हे पण वाचा-तुमचा पार्टनर लाईफ पार्टनर होण्यासाठी योग्य आहे का? असं ओळखा)
मीन
मीन राशीच्या महिला नेगेटिव्ह नेचरच्या असतात. त्या आपल्या पार्टनरबाबतही इन्सिक्योअर असतात. त्यांना असं वाटतं की, त्यांना त्यांचा पार्टनर धोका तर नाही देणार. याच कारणामुळे या सतत आपल्या पार्टनरवर संशय घेत असतात. म्हणून पार्टनरवर सतत लक्ष ठेवतात. (हे पण वाचा-नातं तुटायला मुलांच्या 'या' सवयी ठरतात कारणीभूत)
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)