आपल्या बायकोची भिती जवळपास सर्वच पुरूषांना वाटते, असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. कदाचित याच भितीमुळे अनेक पुरूष आपल्या बायकोपासून अनेक गोष्टी लपवतात किंवा खोटं बोलतात. पण प्रत्येकवेळी गरजेचं नाही की, एखादी चुकीची गोष्ट लपवण्यासाठी खोटं बोलत असतील. अनेकदा आपल्या बायकोला वाईट वाटू नये म्हणूनही अनेक पुरूष खोटं बोलतात. आपल्या राशींवरून अनेक गोष्टी समजण्यास मदत होते. जाणून घेऊया अशाच काही राशींबाबत... ज्या खोटं बोलण्यामध्ये माहिर असतात. पण अनेदा दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी खोटं बोलतात.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या व्यक्तींचा प्रत्येक गोष्टीबाबत वेगळा दृष्टिकोन असतो. मग ती गोष्ट रिलेशनशिपबाबत असली तरिही ते त्याकडे वेगळ्या नजरेतून पाहतात. असं सांगितलं जातं की, जे दुसऱ्यांसाठी खोटं असतं. त्यांना अनेकदा ती गोष्ट खरी वाटते. अनेकदा या कारणांवरून त्यांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या व्यक्ती फार मतलबी स्वभावाच्या असतात. असं सांगितलं जातं की, आपल्या पार्टनरने आपलं सर्व ऐकावं असं सतत या व्यक्तींना वाटत असतं. पार्टनरकडून आपलं काम काढून घेण्यासाठी त्या नेहमी खोट्याचा आधार घेतात. एवढचं नाही आपलं काम पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या विश्वात पुन्हा रममाण होतात.
कर्क राशी
कर्क राशीच्या व्यक्तींना प्रत्येक गोष्ट फिरवून सांगण्याची सवय असते. रहस्यमयी असणाऱ्या या व्यक्ती कोणालाही आपल्याबाबतच्या सर्व गोष्टी सांगत नाहीत. तसेच या आपलं गुपित लपवण्यासाठी पार्टनरसोबत खोटंही बोलतात.
मेष राशी
मेष राशीच्या व्यक्ती खोटं बोलण्यापासून तसे दूर राहतात आणि सत्याच्या कसोटीवर उतरण्यास नेहमी तयार असतात. परंतु, दुसऱ्यांची मदत करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला संकटातून बाहेर काढण्यासाठी या व्यक्ती खोट्याचा आधार घेतात. असं म्हटलं जातं की, या लोकांना खोटं बोलायला आवडत नाही पण दुसऱ्यांच्या आनंदासाठी हे खोटं बोलण्याची रिस्क घेतात.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने फार इमानदार असतात आणि खोटं बोलण्यापासून जेवढं शक्य असेल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा काही गोष्टींमध्ये किंवा पार्टनरच्या भल्यासाठी खोट्याचा आधार घेतात. पण या व्यक्ती खोटं बोलत आहेत, हे सहजासहजी दुसरं कोणाला समजत नाही.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.