जर एखाद्या मुलीला बॉयफ्रेन्ड असेल तर याचा सर्वात जास्त फरक तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना पडतो. संधी मिळताच हे लोक काहीना काही ऐकवतातच. हे ऐकवणं कधी थेट असंत तर कधी फिरवून असतं. चला जाणून घेऊ अशाच काही गोष्टी ज्या मुलींना बॉयफ्रेन्ड असल्यावर ऐकाव्या लागतात.
१) बेटा घरी कुणी सोडलं? -
प्रत्येक डेटनंतर जर तुम्हाला घरी पोहचायला उशीर होत असले तर अर्थातच तुम्हाला तुमचा बॉयफ्रेन्ड ड्रॉप करत असेल. तेव्हा दारात उभी असलेली तुमची आई तुमचं स्वागत या प्रश्नानेच करतात.
२) "तुमचा जोडा असाच आनंदी राहो...देव तुमचं लग्न करो" -
प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलवर, टूरिस्ट प्लेसवर, मंदिरात किंवा मॉल्स बाहेर उभे असलेले भिकारी तुमच्याकडून पैसे काढण्यासाठी असे आशीर्वाद देत असतात.
३) "इतक्या रात्री कुणाशी फोनवर बोलतीये?" -
जेव्हा लेट नाइट तुम्ही फोनवर बॉयफ्रेन्डसोबतच रोमॅंटिक बोलता असता आणि अचानक बाबा रूममध्ये येतात. अशावेळी हे ऐकावं लागतं. पण मुलीही काही कमी नसतात त्यांच्याकडे उत्तर तयार असतं. लगेच सांगतात की, "बाबा... हर्षदाचा फोन आहे...अभ्यासाबाबत बोलतोय..."
4) तो कोण होता बाळा? -
तुमची शेजारची काकी, मावशी, आजी यांना जर तुम्ही बॉयफ्रेन्डसोबत कुठे दिसलात तर हा प्रश्न गरजेचा असतोच. 'तो कोण होता बेटा? "काकी तो क्लासेट..."पण तू तर गर्ल्स कॉलेजमध्ये आहे ना?"(फसलात!).
5) संडेला मुव्ही दाखव नाही तर आईला सांगतो! -
हे फक्त तुमचे लहान भाऊच करू शकतात. अशाप्रकारे वेगवेगळ्या धमक्या देऊन ते तुम्हाला ब्लॅकमेल करत असतात.
६) तुम्ही लग्न कधी करताय? -
तुमचे मित्र असो वा तुमच्या बॉयफ्रेन्डचे मित्र....हा प्रश्न ते विचारतातच. भलेही तुम्ही लग्नाचा काहीही विचार केलेला नसो.
७) या मुलाने तुझ्या खांद्यावर हात का ठेवलाय? -
जर चुकून तुम्ही तुमचा ग्रुप फोटो आईला, काकीला, आजीला किंवा अजून कुणाला दाखवला तर हा प्रश्न असतोच.
८) चांगल्या घरच्या मुली असं नाहीत करत! -
हा सामान्यपणे एखाद्या गार्डनमध्ये बसल्यावर वयोवृद्धांकडून ऐकायला मिळतं. यात काही पोलीस मामांचाही समावेश करता येईल.
९) फिरायला जाताय? कोण कोण येतंय? -
कुठेही फिरायला जाण्याचा प्लॅन झाल्यावर हा प्रश्न आई विचारतेच.