अरेंज मॅरेज सुद्धा एकप्रकारची पहिली भेटच आहे. एक अनोळखी मुलगा एका अनोळखी मुलाला भेटतो आणि आयुष्यभर सोबत राहण्यासाठी लग्न करतात. पण यासाठी मुलाला आणि मुलीला पहिल्यांदा भेटावं लागतं. जेणेकरुन ते एकमेकांना जाणून घेऊ शकतील. पण अनेकदा दोघांनाही त्यांच्या पहिल्या भेटीत काय बोलावं? काय विचारावं? याचं कोडं पडलेलं असतं. ही कोडं सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. याचा तुम्हाला तुमच्या पहिल्या भेटीदरम्यान फायदा होईल.
फिरण्याबाबत बोला
प्रत्येकालाच फिरायला जाणं पसंत असतं. मग का नाही या तुमच्या आवडत्या विषयावर बोलायचं? तुम्हाला फिरणं आवडत नसेल तर तुमच्या आवडत्या गोष्टीवर बोलू शकता. पण याबाबत लगेच बोलणं सुरू करु नका. आधी एकमेकांबाबत प्रश्न विचारा. एकमेकांच्या आवडी-निवडीबाबत बोला. फिरण्यासाठी तुम्हाला कोणतं ठिकाण पसंत आहे हे सांगा. कदाचित तुमचं फेव्हरेट डेस्टिनेशन कॉमनही असू शकतं.
बालपणीच्या आठवणी दुरावा कमी करेल
या विषयावर बोलल्यास तुम्ही दोघेही सहज होऊ शकता. कारण दोघांच्याही बालपणीच्या कितीतरी आठवणी शेअर केल्या जातात. बालपण हे कुणालाही पसंत असतं. मुलगा आणि मुलगी पहिल्यांदाच भेटत असतील आणि एकाच शहरात राहत असतील, तिथेच लहानाचे मोठे झाले असतील तर त्यावर तुम्हा बोलू शकता. याने तुमची ओळख आणखी चांगली होईल.
आवडत्या पदार्थांसंबंधी बोला
वेगवेगळे पदार्थ खाणे कुणाला आवडत नाही? याबाबत प्रत्येकाची वेगवेगळी पसंती असू शकते. त्यामुळे तुम्हाला इतर कोणत्या विषयावर थेट बोलणे अडचणीचे वाटत असेल तर या विषयावर तुम्ही बोलू शकता. याने एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेता येईल.
सिनेमांपासून ते पुस्तकांपर्यंत
सिनेमे पाहणेही प्रत्येकाला आवडतं. जर तुमच्याकडेही बोलण्यासाठी काही विषय नसेल किंवा दुसरं काही बोलण्यात तुम्ही सहज नसाल तर सिनेमांविषयी बोलू शकता. तसेच तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर त्यावरही बोलू शकता.