(Image Credit : Celebree)
अनेक थोरा-मोठ्यांकडून आपण ऐकत असतो की, मुलांच्या खऱ्या शिक्षणाची सुरुवात घरापासूनच होत असते. मुलं लहान असताना त्यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींचं किंवा त्यांपेक्षा मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात. ते जे पाहतात, तेच करतात. त्यामुळे मुलांना चांगल्या सवयींसोबतच वेळोवेळी मार्गदर्शन करणंही आवश्यक आहे. कारण मुलांचं डोकं हे एखाद्या रिकाम्या पुस्तकाप्रमाणे असतं. तुम्ही जसजसं त्यांना शिकवता, मार्गदर्शन करता तसतसं ते शिकतात. त्यामुळे त्यांना जे काही शिकवाल, सांगाल ते समजुतदारपणे, प्रेमाने आणि धीरने शिकवा. अशातच तुमची मुलं जर शाळेत जाऊ लागली असतील तर, त्यांना काही गोष्टी समजावून सांगणं अत्यंत आवश्यक असतं.
काही अशा गोष्टी ज्या मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी शिकवणं गरजेच्या असतं...
1. मुलांना स्वच्छतेचं महत्त्व समजावून सांगा. खासकरून पर्सनल हायजीन. त्यांना सांगा की, जेव्हाही त्याला टॉयलेटला जायचं असेल, त्यावेळी शिक्षकांना किंवा सोबतच्या एखाद्या मित्र-मैत्रिणीला त्याबाबत सांगा. त्यानंतर स्वच्छ हात धुता आले पाहिजे. एवडचं नाही तर स्वच्छता राखली नाही तर त्यांना इन्फेक्शन होऊ शकतं, हे देखील त्यांना न घाबरवता समजावून सांगा. एकदा या सवयी त्यांच्या अंगवळणी पडल्या तर त्या ते कधीच विसरणार नाही.
2. मुलांना सांगा की, त्यांना सर्वांशी प्रेमानं वागणं आवश्यक असतं. कोणाशीही भांडण किंवा मारामारी करू नये. जर त्यांना एखादं मुल त्रास देत असेल तर शिकक्षकांसोबतच पालकांनाही त्याने त्याबाबत सांगितले पाहिजे.
3. मुलांना अभ्यासाबाबतच्या काही बेसिक गोष्टीही सांगा. जंस की, ऐल्फाबेट्स किंवा अंकमोड शिकवा. त्यांना काही कविता शिकवा. त्यामुळे मुलं शाळेत गेल्यावर ब्लँक होणार नाही.
4. जर मुलांना फक्त तुम्हीच जेवण भरवत असाल तर त्यांना स्वतःच्या हाताने जेवण्याची सवय लावा. लक्षात ठेवा की, मुलं काहीही खाण्याआधी हात व्यवस्थित धुत असेल.
5. मुलांना मोठ्या माणसांचा आदर करायला शिकवा. जर त्यांना कोणी काही देत असेल तर त्यावेळी त्यांना थँक्यू म्हणालया शिकवा. जर त्यांचं चुकलं तर त्यांना सॉरी बोलायलाही शिकवा.
6. मुलांना सोशल सर्कलचं महत्त्व समजावून सांगा. तसेच माणसं जोडायलाही शिकवा. त्यांना व्यवस्थित शिकवल्यामुळे ते शाळेत मुलांशी बोलतील आणि मिलून मिसळून राहतील.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.