आज आहे प्रपोज डे. म्हणजे आज प्रिय व्यक्तीला सांगायचं असतं की, तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. मात्र प्रेम व्यक्त करत असताना काही जरा हटके कल्पना वापरल्या तर कदाचित तुम्हाला मिळणारा नकार होकारात बदलू शकतो. वेळेनुसार प्रपोज करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. पूर्वी लोकं एकमेकांना प्रेमपत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त करायचे.
आता फेसबुक, व्हॉट्सएपसारख्या सोशल मीडिया तसेच वेगवेगळ्या माध्यमातून 'मन की बात' केली जाते. पण कोणत्याही पध्दतीने प्रपोज कराल तरी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
१. कोणत्याही मुलीला प्रपोज करत असताना सगळ्यात आधी या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही भारतीय मुलीला प्रपोज करत असाल तर ती कितीही मॉर्डन राहत असेल तर घाई करू नका. संयम ठेवा. आधी तिला तुमच्याबद्दल काय वाटतं ते जाणून घ्या.
२. प्रपोज करायच्या आधी तुमच्या ड्रिम गर्लच्या आवडीनिवडींबाबत जाणून घ्या. त्या मुलीच्या आयुष्यात कोणी आहे का हे आधी जाणून घ्या. तसंच ती मुलगी कोणाला पसंत करते का हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
३.कोणतंही नातं वेळेनुसार जास्त घट्ट आणि मजबूत होत जातं. त्यामुळे तुम्ही त्या मुलीसोबत खूप जास्त प्रेम करता हे उताविळपणे सांगायला जाऊ नका. तुमचं वागणं, स्वभाव त्या मुलीला समजण्याचा चान्स द्या नंतर तुम्ही तुमच्या नात्याला पुढे कंटिन्यू करू शकता.
४. तुम्ही तुमच्या पार्टनरला या गोष्टीची जाणीव करून दया की तुम्ही तिच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सूक आहात. नंतर तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल सुद्धा पार्टनरला सांगू शकता.
५. तुम्ही ज्या व्यक्तीला प्रपोज करणार आहात ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे याची जाणीव करून द्या. पार्टनरच्या फ्रेन्ड्ससोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
६. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज कराल तेव्हा इतर कोणत्याही व्यक्तीचा समावेश दोघांमध्ये करू नका. कारण त्यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते.
७. प्रपोज करायला जाताना रॅन्डम कपडे न घालता तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसेल असे कपडे घाला. ( हे पण वाचा-Propose Day : प्रपोज करण्यासाठी 'हा' फंडा वापराल तर नकाराचं टेंशन विसराल, नकार बदलेल होकारात!)
८. प्रपोज करत असताना काहीतरी वेगळे आणि क्रिेयेटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. जसं की ड्राईव्हला जा, पार्टनरच्या आवडत्या ठिकाणी फिरा.
९. प्रपोज करायला जाताना रॅन्डम कपडे न घालता तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसेल असे कपडे घाला. प्रपोज करत असताना काहीतरी वेगळे आणि क्रिेयेटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. जसं की ड्राईव्हला जा, पार्टनरच्या आवडत्या ठिकाणी फिरा. ( हे पण वाचा-Propose Day : प्रोपोज डे ला 'हे' रोमॅंटिक मेसेज पाठवून प्रपोज कराल तर नक्कीच मिळेल होकार!)