जेव्हा मुलं आपलं शालेय शिक्षण संपवून कॉलेजमध्ये प्रेवश करत असतात. तेव्हा ते फार टेन्शनमध्ये असतात. यावेळी मुलांवर मित्र, त्यांचे सोबत किंवा घरातील माणसांपेक्षा जास्त प्रेशर असतं. या सर्व प्रेशरमधून चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणं, आपलं करियर घडवण्यासाठी योग्य पर्याय निवडणं, मित्र-मैत्रिणींसोबत एक चांगला ग्रुप निवडण्याचं प्रेशर असतं. कारण यावयातील मुलं खरं तर टीनएजमध्ये असतात. जी वयस्क होण्याच्या बॉर्डरलाइनवर असतात. अशातच अनेक प्रकारचे प्रेशर आणि त्रासामधून जाणाऱ्या मुलांसोबत पालकांनी राहणं गरजेचं असतं. पालकांनी त्यांना समजून घेणं, त्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं देणंही गरजेचं असतं. आज आम्ही अशाच पालकांना काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने पालकांना अनेक प्रकारच्या तणावामधून जाणाऱ्या मुलांना सांभाळून घेण्यासाठी आवश्यक टिप्स आणि ट्रिक्स...
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सायकॉलॉजिस्ट बी जॅनेट हिब्स यांनी सांगितल्यानुसार, मुलांना तणावातून बाहेर काढण्यासाठी पालकच मदत करू शकतात. त्यामुळे पालकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं.
- पालकांनी मुलांसोबत बोललं पाहिजे आणि जोपर्यंत शक्य असेल, तोपर्यंत मुलांना प्रोत्साहित करणं गरजेचं असतं. त्यांना हा विश्वास देणं गरजेचं असतं की, तुम्ही त्यांचे आई-वडिला नसून मित्रच आहात. त्यामुळे त्यांना जे काही बोलावसं वाटेल ते मुलं तुमच्याशी बोलू शकतील.
- आई-वडिल आणि मुलांमधील सवांद सध्या नेगेटिव्ह इमोशन्समधून जात आहेत. अनेक घरांमध्ये आई-वडिल आणि मुलांमध्ये संवाद होतच नाही.
(Image Credit : singaporelearner.com)
- हिब्स सांगतात की, पालकांनी मुलांना विचारणं गरजेचं असतं. कॉलेजमध्ये तुझा वेळ कसा जात आहे? तुझं फ्रेंड सर्कल कसं आहे? तू तुझ्या मनातील गोष्टी कोणासोबत शेअर करतो का? तुम्ही मोकळ्या वेळात कॉलेजमध्ये काय करता?
- सर्वात आधी पालकांना आपलं टेन्शन आणि एग्जायटीवर कंट्रोल ठेवणं गरजेचं असतं. तेव्हाच मुलांचा त्रास तुम्ही समजून घेऊ शकता.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.