(Image Credit : Verywell Family)
मुलांचं संगोपन करणं म्हणजे पालकांसाठी अत्यंत अवघड काम. त्यांची काळजी घेण्यात आई-वडिलांना आपलं मुल कधी मोठं झालं हे समजतंच नाही. मुलांचे हट्ट पुरवण्यात बीझी असलेले आई-बाबा अनेकदा त्यांच्या वागण्याकडे आणि सवयींकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा अतीलाडामुळे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुलांना कमी वयातच वाईट सवयी लागतात. पण अशातच योग्य वेळी मुलांना त्या सवयी सोडण्यासाठी भाग नाही पाडलं तर मात्र फार अवघड जातं.
मुलांना सांभाळताना आणि त्यांचे हट्ट पुरवताना पालकांच्य नाकी नव येतात. अशातच मुलं रोज काहीना काही नवीन हट्ट करत असतात. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, मुलांच्या सतत हट्ट करणयाने वैतागलेले पालक त्यांच्यावर प्रेशर टाकतात किंवा त्यांना आमीष देतात. असं केल्यामुळे मुलांच्या सवयी आणखी बिघडतात आणि ते अनहेल्दी खाण्याकेड जास्त आकर्षित होतात. ज्यामुळे त्यांचं वजन वाढतं. त्यांची ही सवय सोडवण्यासाठी पालक अनेक प्रयत्न करतात. पण त्यांच्या कोणत्याच प्रयत्नांना यश येत नाही. अशातच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने मुलांच्या या सवयी सुधारण्यासाठी तुम्हाला मदत होईल.
- मुलं लहान असतानाच त्यांना जेवढं शक्य असेल तेवढं न्यूट्रिशनल फूड खाण्यासाठी द्या. त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळू शकतील.
- जर तुमचं मूल जेवताना अनेक कारणं देत असेल तेव्हा इग्नोर करणं हाच एकमेव उपाय आहे. त्यांना जास्त अटेंशन दिल्याने त जास्त हट्ट करण्यास सुरुवात करतात.
- प्रत्येक दिवशी मुलांच्या खाण्याची वळ निश्चित करा. यामुळे त्यांना या वेळत जेवण्याची सवय लागेल आणि त्याच वळेत त्यांना नियमित भूक लागेल, त्यामुळे ते खाण्यासाठी नाही म्हणू शकणार नाहीत.
- खाताना मुलांना टिव्हीसमोर बसून ठेवू नका किंवा गेम, खेळणी यांसारखे कोणतेच डिस्ट्रॅक्शंस ठेवू नका.
- मुलं थोडी मोठी असतील तर जेवण तयार करताना त्यांची मदतही घेऊ शकता. त्यांना छोटी-छोटी कामही करण्यास सांगा. त्यामुळे जेवणाबाबत ती सकारात्मक विचार करू शकतील.
- मुलांना खाण्यासाठी जे पदार्थ देत असाल त्यांना व्यवस्थित डेकोरेट करा. त्यामुळे त्यांना पदार्थ खाण्याची इच्छा होते.