(Image Credit : YouTube)
तरूणाईची Valentine's Day ची प्रतिक्षा आता संपली आहे. प्रेमाचा हा दिवस साजरा करण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून तयारी सुरू असते. आज अखेर कपल्स हा दिवस साजरा करतील. कपल्ससाठी हा दिवस सर्वात मोठा मानला जातो. पण सिंगल लोकांचं काय? त्यांच्यासाठी तसा हा दिवस तसा काही खास नसतो. त्यांच्या मनात काय सुरू असतं हे त्यांनाच माहीत. पण या सिंगल लोक सुद्धा हा दिवस साजरा करू शकतात.
सगळीकडे कपल्स
अनेक सिंगल्ससाठी १४ फेब्रुवारी हा दिवस टॉर्चरसारख असतो. कारण जिकडे पाहिलं तिकडे केवळ कपल्स दिसतात. हे बघून सिंगल लोकांना ते सिंगल असल्याची जाणीव करून देतात. म्हणजे हे जखमेवर मीठ चोळल्यासारखंच होतं ना राव!
सिंगल आहे म्हणून काय झालं?
जर तुम्ही सिंगल असाल तर १४ फेब्रवारी सेलिब्रेट करण्यासाठी बॉयफ्रेन्ड किंवा गर्लफ्रेन्ड आयुष्यात येण्याची वाट बघण्याची गरजच नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने हा दिवस साजरा करू शकता.
फिरायला जा
व्हॅलेंटाइन डे आणि त्यानंतरचे दोन दिवस सुट्टी घ्या आणि कुठेतरी शांत ठिकाणी निघून जा. असं एखादं तरी ठिकाण असेल ना जिथे तुमची जाण्याची इच्छा असेल पण अनेक दिवसांपासून तिथे जाणं शक्य होत नसेल. त्या ठिकाणी जाण्याची या दिवसापेक्षा चांगली संधी कोणती असेल?
मुव्ही बघा
तुम्हाला जर कुठे बाहेर जायचं नसेल तर तुम्ही तुमच्या बघायच्या राहून गेलेल्या मुव्ही बघू शकता. याने तुमचा चांगला वेळही जाईल आणि चांगले मुव्ही सुद्धा बघून मिळतील.
शॉपिंग करा
माइंड डायव्हर्ट करण्याचा शॉपिंगपेक्षा चांगला दुसरा पर्याय नसेल. तुम्ही म्हणाल की, मॉल्समध्ये कपल्सची गर्दी असेल. पण मग तुम्ही लोकल मार्केटमध्ये फेरफटका मारू शकता. कदाचित तुम्हाला चांगल्या वस्तू खरेदी करायला मिळतील.
हिल स्टेशन
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी अशा हिल स्टेशनला जा जिथे फार कुणी जात नसेल. अशावेळी तुम्हाला स्वत:सोबत चांगला संवाद साधता येतो. आणि तुम्हाला शांतताही मिळते. कधी कधी एकट्यात असा वेळ घालवणं फार फायदेशीर ठरतं.
अॅडव्हेंचर ट्रिप करा प्लॅन
१४ फेब्रुवारीला तुम्ही अॅडव्हेंचर ट्रिपचाही प्लॅन करू शकता. बंजी जंपिगपासून ते रिवर राफ्टिंगसारखे अॅडव्हेंचरस स्पोर्ट्स तुम्ही करू शकता.