व्हॅलेंटाईन वीक सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले आहेत. कोणत्याही नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी फेब्रवारी महिन्यातील हे दिवस महत्वपूर्ण ठरत असतात. फक्त प्रियकर आणि प्रेयसी नाही तर मित्र मैत्रिणीच्या नातं सुद्धा या दिवसात घट्ट होतं असतं. कारण या निमित्ताने आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू दिल्या जातात. तसंच भेटी सुद्धा होत असतात.
खरं पाहायला गेलं तर सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये वेळ हा कोणालाच नसतो. कारण कॉलेज संपल्यानंतर सगळ्यांनाच असं वाटायला लागतं की हे सगळं डेज् सेलिब्रेट करणं. एका वयापुरता मर्यादित असतं. आपण आत्ता खूप बिझी झालो. पण त्यातही जर काहीवेळ काढून आपण आपल्या जीवलगांसोबत आनंदाचे काही क्षण घालवले मनाला खूप आनंद होईल. आज आम्ही तुम्हाला व्हेलेंटाईन वीकचं वेळापत्रक सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही त्या दिवसाची तयारी करू शकता. ( हे पण वाचा-
जर तुम्हाला एखाद्या समोर आपलं प्रेम व्यक्त करायचं असेल तर तुम्ही रोज डे च्या दिवशी करू शकता. जर तुम्ही आधीच रिलेशनशीपमध्ये असाल तर आपल्या पार्टनरला प्रपोज डे च्या दिवशी तुम्ही प्रपोज करू शकता. त्यानंतर चॉकलेट डे आहे. सगळ्याच मुलींना चॉकलेट आवडत असतात. तुम्ही या दिवशी आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी चॉकलेट्स द्याल तर आनंद होईल. अशा रितीने वेगवेगळे नात्यातील प्रेम वाढवणारे १४ फेब्रुवारी पर्यंत डेज् साजरे करून तुम्ही २०२० चा फेब्रवारी महिना रोमॅन्टिक आणि अविस्मरणीय बनवू शकता. कारण १४ फेब्रुवारीवला आता काही दिवस शिल्लक असल्यामुळे झटपट प्लॅनिंग करा.